सर्वाधिक रन्स करणारा फलंदाज
इशान किशन याने फायनलमध्ये केवळ 49 बॉल्समध्ये 101 रन्सची तुफानी सेंच्युरी झळकावली. त्याच्या या वादळी खेळीमुळे झारखंडने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 262 रन्सचा हिमालय उभा केला होता. या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना हरियाणाची टीम 193 रन्सवर गारद झाली आणि झारखंडने 69 रन्सने ही मॅच जिंकली. या संपूर्ण स्पर्धेत 10 डावात 517 रन्स करून इशान सर्वाधिक रन्स करणारा फलंदाज ठरला आहे.
advertisement
खूप वाईट वाटले होते, मात्र...
या विजयानंतर स्पोर्ट्सस्टारशी बोलताना इशान किशनने आपल्या संघनिवडीबाबतच्या वेदना व्यक्त केल्या. तो म्हणाला की, जेव्हा चांगली कामगिरी करूनही टीम इंडियात निवड झाली नाही, तेव्हा खूप वाईट वाटले होते. मात्र, आता मी त्या मानसिकतेतून बाहेर आलो असून, मला स्वतःला अजून सिद्ध करायचं आहे, असंही इशान किशन यावेळी म्हणाला.
मी स्वतःला सांगितले की जर...
दरम्यान, मी स्वतःला सांगितले की जर या कामगिरीनंतर माझी निवड झाली नाही, तर कदाचित मला आणखी काही करावे लागेल, कदाचित मला माझ्या संघाला जिंकण्यास मदत करावी लागेल, असं इशान किशन म्हणाला. नोव्हेंबर 2023 पासून तो भारतीय संघाबाहेर आहे, पण या धडाकेबाज कामगिरीनंतर आता पुनरागमनाचे मार्ग मोकळे झाले आहेत.
