TRENDING:

Kane Williamson : कमबॅकनंतरचा योगायोग की आणखी काही...! विराटच्या बाबतीत जे झालं तेच विलियम्सनसोबत घडतंय, पाहा काय?

Last Updated:

Kane Williamson Golden Duck : विल्यमसनने यावर्षीही ब्लॅक कॅप्सचा सेंट्रल करार नाकारला होता, ज्यामुळे त्याला आपण कोणत्या सामन्यांमध्ये किंवा टूरमध्ये खेळायचे याचा निर्णय घेण्याची मुभा मिळाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ENG vs NZ 1st ODI : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणारा न्यूझीलंडचा अनुभवी बॅटर केन विल्यमसन याला (Kane Williamson) इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात शून्यावर बाद व्हावं लागलं. या दौऱ्यावर टी20 मालिका अतिवृष्टीमुळे रद्द झाल्यामुळे इंग्लंडने ती 1-0 ने जिंकली होती, त्यामुळे वनडे मालिकेत त्यांचा आत्मविश्वास वाढलेला होता. अशातच आता न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. विराट कोहलीची जशी परिस्थिती झाली, तशीच परिस्थिती केन विलियम्सनची झाली आहे.
Williamson Golden Duck makes Virat Kohli
Williamson Golden Duck makes Virat Kohli
advertisement

ब्लॅक कॅप्सचा सेंट्रल करार नाकारला

विल्यमसनने यावर्षीही ब्लॅक कॅप्सचा सेंट्रल करार नाकारला होता, ज्यामुळे त्याला आपण कोणत्या सामन्यांमध्ये किंवा टूरमध्ये खेळायचे याचा निर्णय घेण्याची मुभा मिळाली आहे. न्यूझीलंड टीम 224 रन्सच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करत असताना, सलामीवीर विल यंग लवकर विकेट गमावून बसला. त्यानंतर नंबर 3 वर बॅटिंगसाठी आलेल्या केन विल्यमसनला ब्रायडन कार्सने पहिल्याच बॉलवर बाद केले आणि तो गोल्डन डकवर (Kane Williamson Golden Duck) पॅव्हेलियनमध्ये परतला.

advertisement

केन विल्यमसन गोल्डन डक

विल्यमसनचा हा 'शून्य'वर बाद होण्याचा प्रकार भारतीय दिग्गज विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनाच्या सामन्याची आठवण करून देणारा ठरला. पर्थ येथे मिचेल स्टार्कविरुद्ध विराटलाही शून्यावर बाद व्हावे लागलं होतं, मात्र तो 7 बॉल खेळला होता. अशातच आता केन मामा देखील विराटसारखं कमबॅक करणार की काय? असा सवाल विचारला जात आहे.

advertisement

केन न्यूझीलंडला वनडे मालिका जिंकवणार?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

दरम्यान, आयसीसी क्रमवारीत सध्या न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांनी नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतविरुद्ध उपविजेतेपद मिळवले होते. या पार्श्वभूमीवर विल्यिमसनचे पुनरागमन महत्त्वाचं होतं. अशातच आता केन न्यूझीलंडला वनडे मालिका जिंकून देतो का? हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Kane Williamson : कमबॅकनंतरचा योगायोग की आणखी काही...! विराटच्या बाबतीत जे झालं तेच विलियम्सनसोबत घडतंय, पाहा काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल