Karun Nair Century, Ranji Trophy 2025-26 : टीम इंडियात सध्या भयंकर स्पर्धा वाढली आहे. एका मालिकेत एखादा खेळाडू फ्लॉप ठरला तर त्याला लगेचच दुसऱ्या मालिकेत बसवलं जातं. असं एका खेळाडूसोबत इंग्लंड मालिकेदरम्यान घडलं होतं.त्यामुळे त्याला वेस्ट इंडिज दौऱ्यात डच्चू देण्यात आला होता. पण आता याच खेळाडूने मैदान मारलं आहे.या खेळाडूने 174 धावांची नाबाद खेळी केली आहे.या खेळीत त्याने 14 चौकार आणि 3 षटकार लगावले आहेत. या खेळीने त्याने पुन्हा एकदा टीम इंडियाचं दार ठोठावलं आहे. त्यामुळे हा खेळाडू नेमका कोण आहे? हे जाणून घ्या.
advertisement
हा तोच खेळाडू आहे ज्याने क्रिकेटकडे एक संधी मागितली होती. त्यानंतर त्याला इंग्लंड विरूद्ध पाच सामन्यांच्या टेस्ट मालिकेत खेळण्याची संधी मिळाली होती. पण या संधीच त्याला सोनं करता आलं नव्हतं आणि तो सपशेल अपयशी ठरला होता. हा खेळाडू अर्थात करूण नायर होता. इंग्लंड विरूद्ध मालिकेत फ्लॉप ठरल्यानंतर त्याला वेस्ट इंडिज विरूद्ध मालिकेतून बाहेर करण्यात आले होते.
या दरम्यान संघातून बाहेर झाल्यानंतर करूण नायरने रणजी ट्रॉफी खेळण्याचा निर्णय घेतला होता.हा त्याचा निर्णय़ आता यशस्वी ठरला आहे.कारण त्याने कर्नाटककडून खेळताना गोवा संघाविरूद्ध 174 धावांची नाबाद खेळी केली आहे. या खेळीत त्याने 14 चौकार आणि 3 षटकार लगावले आहेत.या त्याच्या खेळीने त्याने पुन्हा निवड समितीचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे आता डिसेंबरमध्ये पार पडणाऱ्या टेस्ट मालिकेत त्याला संधी मिळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान रणजी ट्ऱॉफी मालिकेत कर्नाटकची सूरूवात चांगली झाली नव्हती.कर्नाटकचे 26 धावांवर 2 विकेट पडले असताना नायर मैदानात आला होता.
यावेळी त्याने पहिल्यांदा श्रेयस गोपाळ (57) सोबत 94 धावांची आणि नंतर विजयकुमार वैशाख (31) सोबत 60 धावांची भागीदारी केली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने शतक पूर्ण केले आणि त्याचे २५ वे प्रथम श्रेणी शतक नोंदवले, जे विदर्भासोबत खेळल्यानंतर कर्नाटकात परतल्यानंतरचे त्याचे पहिले शतक होते. त्याने 267 चेंडूत 14 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 174 धावा केल्या. या धावांच्या बळावर कर्नाटकचा पहिला डाव 371 धावांवर ऑल आऊट झाला होता. तर गोव्याचा डावाला सुरुवात झाली आहे.
