रिटेन्शन करताना झालेली चूक
खरं तर 15 नोव्हेंबर 2025 ला आयपीएलच्या सर्व टीम्सनी आपली रिटेन्शन यादी जाहीर केली होती. ही यादी जाहीर करताना शाहरुख खानच्या कोलकत्ता संघाने मोठी चूक केली होती. कोलकत्ताच्या संघाने आंद्रे रसेल सह पाच खेळाडूंना रिलीज केले होते. आंद्रे रसेह हा वेस्ट इंडिजचा पावर हिटर खेळाडू आहे.हा खेळाडू ताबडतोब आणि धडाकेबाज खेळी करण्यास प्रसिद्ध आहे. आता याच खेळाडूला शाहरूख खानच्या कोलकत्ताने रिलीज केले आहे. एक असा खेळाडू आहे जो सामन्याचा निकाल कधीही पालटू शकतो त्याला अशाप्रकारे रिलीज करून कोलकत्ताने चूक केली होती.
advertisement
शाहरुखने चुक सुधारली
कारण आता पुढे रसेलला रिलीज केल्यामुळे त्याला संघात घेण्यासाठी सर्वच फ्रॅचायजी मागे लागतील.कारण असा खेळाडू कुणाला संघात नको असेल. त्यामुळे शाहरूखने रसेलला रिलीज करून हीच मोठी चूक केली होती.हीच चुक शाहरूखच्या लक्षात येताच त्याने आंद्रे रसल पुन्हा संघात ठेवून घेतलं आहे. आणि त्याच्या खांद्यावर एक नवीन जबाबदारी दिली आहे.शाहरुख खानने आंद्रे रसेलला पॉवर कोच म्हणून नियुक्त केले आहे.
खरं तर शाहरुखच्या कोलकत्ताचा मुख्य कोच आहे अभिषेक नायर आहे. त्याच्यासोबत असिस्टंट कोच शेन वॉर्न आहे. मेंटॉर ड्वेन ब्रावो आहे.बॉलिंग कोच टीम साऊथी आहे. या सर्व कोचसोबत शाहरूखने पॉवर कोच म्हणून आंद्रे रसलला जबाबदारी दिली आहे. विशेष म्हणजे ही जबाबदारी देऊन मोठा धोका टाळला आहे.
मुंबईने काही वर्षापूर्वी असाच डाव टाकला
खरं तर शाहरूख वर जी परिस्थिती आज ओढवली होती तशीच परिस्थिती मुंबई इंडियन्सवर काही वर्षापूर्वी ओढवली होती. मुंबई इंडियन्ससाठी किरण पोलार्ड 13 हंगाम आयपीएल खेळला, 2010 ते 2022.त्यानंतर मुंबई त्याला रिलीज करू शकली असती पण असा धडाकेबाज फलंदाज इतर संघात जाऊ नये म्हणून मुंबईने त्याला निवृत्ती घ्यायला लावले आणि मुंबईचा बॅटींग कोच केला. त्यामुळे मुंबईने या ठिकाणी माईंडगेम खेळून पोलार्डला कायमचा आपल्याकडे घेऊन ठेवला. पोलार्ड आता मुंबईसाठी इतर लीग खेळतोय फक्त तो आयपीएलमध्ये खेळत नाही. त्यामुळे मुंबईने त्यावेळी घेतलेला तो निर्णय खूपच भारी होता.
कोलकत्ताने रिटेन केलेले खेळाडू
रिंकू सिंग,अंग्रेश रघुवंशी,अजिंक्य रहाणे,मनीष पांडे, रोवमन पॉवेल, सुनील नारायण,रमनदीप सिंग,अनुकुल रॉय,वरुण चक्रवर्ती,हर्षित राणा,वैभव अरोरा, उमरन मलिक
रिलीज खेळाडूंची यादी
लवनीत सिसोदिया,क्विंटन डी कॉक, रहमानउल्ला गुरबाज,वेंकटेश अय्यर, आंद्रे रसेल,मोईन अली, स्पेंसर जॉन्सन,अँरिक नोरखिया,
चेतन सकारिया
