रुटला शतक झळकावण्यात यश
रूटने यंदाच्या अॅशेसमध्ये आपल्या पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात सेंच्युरी ठोकली. ऑस्ट्रेलियातील आपल्या 16 व्या टेस्ट मॅचमध्ये अखेरीस त्याला शतक झळकावण्यात यश आलं. रूटला ऑस्ट्रेलियात कोणत्याही टेस्ट मॅचमध्ये प्रथमच 'ट्रिपल-फिगर' गाठण्यासाठी 181 बॉलचा सामना करावा लागला. पिंक बॉल टेस्टमधील जो रूटचे शतक हे मॅथ्यू हेडन याच्यासाठी खूप मोठा दिलासा घेऊन आलं.
advertisement
रुट टेस्ट शतक बनवू शकला नाही तर मी...
हेडन याने सिरीजच्या तयारी दरम्यान म्हटलं होतं की, जर रूट यावेळी ऑस्ट्रेलियात टेस्ट शतक बनवू शकला नाही, तर मी मेलबर्नमध्ये नग्न फिरेल. सप्टेंबर 2025 मध्ये 'ऑल ओव्हर बार द क्रिकेट पॉडकास्ट' (All Over Bar The Cricket Podcast) दरम्यान मॅथ्यू हेडन म्हणाला होता, "तो इंग्लंडच्या टीममधील सर्वात 'कम्प्लीट पॅकेज' आहे. त्यांचा 'एवरेज' 40 चा आहे. मला विश्वास बसत नाही की तुमच्या टीममध्ये जो रूट नाही. मी या समरच्या अखेरीस तुमच्याशी बोलणार आहे. जर त्याने या समरमध्ये सेंच्युरी केली नाही, तर मी MCG मध्ये नग्न फिरेन."
तू आमचे डोळे वाचवलेस - ग्रेस हेडन
हेडन याची मुलगी ग्रेस हेडन देखील कॉमेंट्री करत आहे, तिने जेव्हा रूट शतकाकडे वाटचाल करत होता, तेव्हा ट्वीट केले होतं की, "कृपया जो रूट तू शतक बनव." यावरून हेडन कुटुंबियांवर किती तणाव होता हे स्पष्ट होते. रूटने आपल्या टेस्ट कारकिर्दीतील 40 वं आणि ऑस्ट्रेलियातील पहिलं शतक पूर्ण केल्यानंतर, इंग्लंड क्रिकेटने मॅथ्यू हेडन याचा एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये तो रूटला अभिनंदन करत होता. अशातच रूटच्या सेंच्युरीनंतर ग्रेस हेडनने इन्टा स्टोरी शेअर करत रूटचे आभार मानले. तू आमचे डोळे वाचवले, असं ग्रेस हेडन म्हणाली.
माझ्यापेक्षा जास्त आनंद कोणालाच झाला नाही
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये मॅथ्यू हेडन म्हणाले, "गुडडे जो, ऑस्ट्रेलियात सेंच्युरी बनवल्याबद्दल अभिनंदन मित्रा. तुला थोडा वेळ लागला, आणि खरं सांगायचं तर, माझ्यापेक्षा जास्त आनंद कोणालाच झाला नाही. मी मनापासून तुझ्या सेंच्युरीला सपोर्ट करत होतो. तर मित्रा, अभिनंदन, 10 फिफ्टी आणि अखेरीस सेंच्युरी. खूप एन्जॉय कर आणि याचा पूर्ण आनंद घे." हेडन यांनी दिलेला शब्द पाळल्याबद्दल जो रूटचे आभार मानले आहेत.
