भारतात जन्मलेल्या मोनांक पटेल मेजर लीग क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. अमेरिकेसाठी आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या मोनांक पटेल एमएलसीच्या (MLC 2025) इतिहासात सर्वात मोठी खेळी करणारा खेळाडू बनला आहे. गुजरातच्या आणंदमध्ये 1 मे 1993 रोजी जन्मलेल्या मोनांकने मुंबई इंडियन्स न्यूयॉर्ककडून खेळताना खतरनाक कारनामा केला आहे. मोनांकने सिएटल ऑकार्सच्या विरूद्ध 50 बॉलमध्ये 93 धावांची वादळी खेळी केली. या खेळीत त्याने 7 षटकार आणि 8 चौकार लगावले आहेत. मोनांकच्या या सर्वाधिक खेळीच्या बळावर मुंबईने 7 विकेटसने हा सामना जिंकला आहे.
advertisement
सिएटल ऑकार्सने प्रथम फलंदाजी करताना 5 विकेट गमावून 200 धावा केल्या होत्या.त्यामुळे मुंबईसमोर 201 धावांचे आव्हान होते.या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईकडून मोनांक पटेलने 93 धावांची खेळी केली. त्याला मिचेल ब्रेसवेलने 50 धावांची चांगली साथ दिली. त्यानंतर शेवटच्या क्षणी किरन पोलार्डने 10 बॉलमध्ये 26 धावा काढल्याने मुंबईने हा सामना 7 विकेटस राखून जिंकला.
तर सिएटल ऑकार्सकडून कायल मेयर्सने 88 धावांची खेळी केली होती. त्याच्य़ा जोडीला शायन जहांगिरने 43 धावा जोडल्या होत्या. या धावांच्या बळावर सिएटल ऑकार्सने प्रथम फलंदाजी करताना 5 विकेट गमावून 200 धावा केल्या होत्या.
दरम्यान हा सामना जिंकून मुंबईने विजयाचं खातं उघडलं आहे. या विजयासह मुंबई पॉईट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी पोहोचली आहे. याआधी दोन सामन्यात मुंबईला पराभवाला सामोरे जावे लागले होते.तर सिएटल ऑकार्सला सलग तिसरा पराभव स्विकारावा लागला.त्यामुळे हा संघ पाचव्या स्थानी आहे.