Mohammad Shami News : टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने रणजी सामन्यात धमाका केला आहे. मंगळवारी गुजरात विरूद्ध खेळताना त्याने बंगालकडून एकट्याने 8 विकेट घेतल्या होत्या. शमीने त्याच्या याच कामगिरीतून निवड समितीला सणसणीत उत्तर दिलं होतं. त्यानंतर आता बंगालचे कोच लक्ष्मी रतन शुक्ला यांनी मोहम्मद शमीची पाठराखण करत निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांना सुनावलं आहे. त्यामुळे बंगालचे कोच नेमकं काय म्हणाले आहेत? हे जाणून घेऊयात.
advertisement
''तुम्ही सर्वांनी शमीने कशी गोलंदाजी केली हे पाहिले. मला काहीही सांगायचे नाही. त्याच्या कामगिरीने सर्व काही सांगितले. त्याच्या वचनबद्धतेबद्दल कोणताही प्रश्न नाही'', असे शुक्ला म्हणाले. “मोहम्मद शमी काय आहे हे संपूर्ण जगाला माहिती आहे. त्याला (मोहम्मद शमीला) कोणाकडूनही प्रमाणपत्राची गरज नाही. त्याची गोलंदाजी हेच प्रमाणपत्र आहे. तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे'', अशा शब्दात लक्ष्मी रतन शुक्ला यांनी अजित आगरकर यांना स्पष्ट शब्दात सुनावलं आहे. मोहम्मद शमीला फिटनेसच्या कारणास्तव भारताच्या कसोटी संघातून वगळण्यात आल्याचे कारण आगरकरने दिले होते.त्यानंतर शमीने मी फिट नसलो असतो तर रणजी सामने खेळलोच नसतो.त्यामुळे शमीच्या फिटनेसवरून मोठा वाद पेटला होता.
शमीला आपण सर्व सात सामने खेळवायला लावू शकत नाही, जरी तो तंदुरुस्त असल्याचे आणि प्रत्येक सामना खेळण्याची इच्छा असल्याचे सांगत असला तरी. तो ज्या पद्धतीने मैदानात उतरत आहे ते अविश्वसनीय आहे. 500 बळी घेतल्यानंतरही तो उत्तम लयीत आहे आणि पूर्ण शांततेने खेळत आहे, असे कोच रश्मी शुक्ला यांनी सांगितले.
गुजरात संघाविरूद्ध विजयी मिळवल्यानंतर मोहम्मद शमीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी तो तंदुरुस्त आणि तयार असल्याची माहिती दिली होती. प्रत्येक व्यक्ती देशासाठी खेळू इच्छितो. मी पुन्हा त्यासाठी तयार आहे.माझी प्रेरणा तंदुरुस्त राहणे आणि कामगिरी करत राहणे आहे,बाकी निवडकर्त्यांवर अवलंबून आहे,असे मोहम्मद शमी म्हणाला होता.
शमीची निवड होणार?
मोहम्मद शमीने बंगाल संघाकडून दोन रणजी सामने खेळले आहेत. यामध्ये पहिल्या सामन्यातील दोन डावात 7 तर दुसऱ्या सामन्यातील दोन डावात 8 अशी एकूण 15 विकेट घेतली आहे. ही त्याची कामगिरी पाहता त्याची संघात निवड होईल असे नक्कीच वाटते. सध्या तरी भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सूरू आहे.त्यानंतर दक्षिण आफ्रिका भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात टेस्ट मालिकेसाठी आता मोहम्मद शमीची निवड होते की नाही? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
