व्यापक विचार लक्षात घेऊन कॉम्बिनेशन वापरतोय
बॉलिंग कोच मोर्ने मोर्केल यांनी गुरुवारी चौथ्या टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय मॅचपूर्वी पत्रकारांना सांगितलं, "अर्शदीप अनुभवी बॉलर आहे आणि त्याला माहित आहे की आम्ही व्यापक विचार लक्षात घेऊन वेगवेगळे कॉम्बिनेशन वापरत आहोत. त्याला माहित आहे की तो एक विश्वस्तरीय बॉलर आहे आणि त्याने पॉवरप्लेमध्ये जास्त विकेट घेतले आहेत." मोर्केल पुढं म्हणाला, अर्शदीप टीमसाठी किती मौल्यवान आहे हे आम्हाला माहीत आहे, पण आम्हाला इतर कॉम्बिनेशनचाही विचार करण्याची गरज होती आणि त्याला अर्शदीपला समजतं, असं मोर्ने मोर्केल म्हणाला.
advertisement
कोणताही निर्णय घेणं सोपं नसतं
मोर्केल याने हे मान्य केलंय की, अर्शदीपसारख्या गुणी बॉलरसाठी हा काळ सोपा नाही. बॉलिंग कोचने आपल्या निर्णयाचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करताना सांगितलं, कोणताही निर्णय घेणं सोपं नाही. खेळाडू आणि सिलेक्शनबद्दल निराशा नेहमी असते, पण एक खेळाडू म्हणून कधीकधी ते अनियंत्रित होते. या सीरिजनंतर T20 मॅच फार कमी शिल्लक आहेत, त्यामुळे कोचिंग स्टाफचा खेळाडूंना एकच सल्ला आहे की त्यांनी दबावाच्या परिस्थितीत आपला सर्वोत्तम परफॉर्मन्स द्यावा. असंही मोर्केल यांनी म्हटलं आहे.
प्रयोग करून पाहिलं नाही तर...
तुमच्याकडे पर्याय उपलब्ध असले पाहिजेत. मला वाटते की जर तुम्ही जगभर पाहिले तर प्रत्येक संघ पर्यायांसह प्रयोग करत आहे. जर तुम्ही संघात प्रयोग करून पाहिलं नाही तर आणि त्या परिस्थितीत ते दबाव कसा हाताळतात हे पाहिले नाही तर तुम्हाला कधीही कळणार नाही, असंही मोर्केल म्हणतो.
क्रिकेट हा चतुराईने खेळण्याचा खेळ
दरम्यान, टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी तीन महिन्यांचा काळ शिल्लक आहे. त्यामुळे आता गंभीर वेगवेगळे प्रयोग करतोय. दोन वर्षानंतर एका ठिकाणी बसून तुम्ही विचार करू शकत नाही की, जर तेव्हा असं कॉम्बिनेशन खेळवलं असतं तर चांगलं झालं असतं. वेळ गेल्यावर विचार केला तर त्याला अर्थ नसतो. त्यामुळे आताच वेळ आहे. क्रिकेट हा चतुराईने खेळण्याचा खेळ आहे, असंही मोर्केल म्हणाला आहे.
