खरं तर दिल्ली आणि चेन्नई विरूद्धचा सामना चेपॉकच्या मैदानावर सूरू आहे. हा सामना पाहण्यासाठी महेंद्रसिंग धोनीचे आई वडील आले आहेत. खरं तर पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे. कारण आता आयपीएलचा 18 वा हंगाम सुरु आहे. या इतक्या हंगामात एकदाही धोनीचे आई वडील त्याचा सामना पाहण्यासाठी आले नव्हते. त्यामुळे सोशल मीडियावर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना वेग आला आहे.
advertisement
यंदाच्या हंगामात एमएस धोनीच्यी खेळीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. एका सामन्यात तर गरज असताना धोनी मैदानावर आलाच नाही. त्यानंतर सामना चेन्नईच्या हातातून निसटल्यानंतर धोनी मैदानात उतरला होता.धोनीच्या या फलंदाजीच्या क्रमवारीवरून त्याच्यावर तुफान टीका झाली होती.
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): जेक फ्रेझर-मॅकगर्क, केएल राहुल (विकेटकिपर), अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, समीर रिझवी, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): रचिन रविंद्र, डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), विजय शंकर, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकिपर), रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, मुकेश चौधरी, खलील अहमद, मथीशा पाथिराना
