पोलीस तपासात आढळलं 'स्टन शेल'
वृत्तानुसार, सर्व मुलांना गंभीर अवस्थेत जीएमसी हंदवाडा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रहस्यमयी स्फोटाची माहिती मिळताच, पोलिस आणि सुरक्षा दल घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात घटनास्थळी एक स्टन शेल सापडल्याचे समोर आले आहे. कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणादरम्यान सुरक्षा दलांकडून हे शेल सामान्यतः वापरले जातात. मुलांचा एक गट मोकळ्या मैदानात क्रिकेट खेळत असताना हा स्फोट झाला.
advertisement
परिसरात एकच खळबळ
स्फोटात जखमी झालेल्या चारही मुलांची प्रकृती सध्या स्थिर आहे. या घटनेनंतर पोलिसांनी परिसराला वेढा घातला आणि स्फोटाचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला. वृत्तानुसार, हा स्फोट जुन्या शेलमुळे झाला. स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ पसरली. क्रिकेट खेळणारी मुले जमिनीवर जखमी अवस्थेत आढळली. या संपूर्ण घटनेत अद्यापही स्फोट का झाला? याच कारण समजू शकलेलं नाही, तथापि, जुन्या शेलमुळे स्फोट घडला असल्याचं प्रथमदर्शनी सांगितलं जात आहे.
घटनास्थळ सील करण्यात आले
गावकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि सर्व मुलांना रुग्णालयात दाखल केले. मुले ज्या मैदानावर क्रिकेट खेळत होती ते मैदान सील करण्यात आले आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, परिसरात सोडलेल्या जुन्या गोळ्यामुळे हा स्फोट झाल्याचा संशय आहे. स्फोटाचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सर्व मुले तुतीगुंड कुलंगम येथील रहिवासी आहेत. या घटनेचा पुढील तपास सध्या स्थानिक पोलीस करत आहेत.
