स्पिनर्सकडून सर्वात कमी ओव्हर
सनरायझर्स हैदराबादच्या (SRH) फिरकीपटूंसाठी मागील सीझन विसरण्यासारखा ठरला असला, तरी IPL 2026 साठी मात्र हैदराबादने 'स्पिनर्स प्लॅन' तयार केला आहे. मागील वर्षी सर्व 10 टीम्समध्ये हैदराबादने फिरकीपटूंकडून सर्वात कमी म्हणजे केवळ 27.2 टक्के ओव्हर्स टाकल्या होत्या. हैदराबादसाठी स्पिनर्स व्हिलन ठरले होते. अशातच आता यंदाच्या हंगामात हैदराबादला यावर मात करावी लागणार आहे. हैदराबादने यासाठी युवा स्टार स्पिनरला संघात जागा दिली आहे.
advertisement
तीन स्पिनर्सवर बोली लावली
संघाची फिरकीची ही कमतरता भरून काढण्यासाठी मॅनेजमेंटने या लिलावात अनुभवी नावांपेक्षा युवा आणि 'मिस्ट्री' स्पिनर्सवर मोठी बोली लावली आहे. केरेन्स फुलाटर, अमित कुमार, शिवांग कुमार या तीन स्पिनर्सला हैदराबादने संघात घेतलंय खरं पण त्यांच्याकडे अनुभवी स्पिनर्सची कमतरता आहे. कमिन्डू मेंडिस वगळता त्यांना फास्टर्स बॉलर्सवर अवलंबून रहावं लागतंय. सनरायझर्सच्या स्पिनर्सचं नेतृत्व विदर्भाचा डावखुरा फिरकीपटू हर्ष दुबे करण्याची शक्यता आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तब्बल 69 विकेट्स घेण्याचा कारनामा केल्यानंतर तो आता ऑरेंज आर्मीसाठी मुख्य अस्त्र ठरणार आहे. काव्याला मोठ्या स्पिनर्सवर बोली लावता आली नाही, इथंच मोठी चूक झाली.
लियम लिव्हिंगस्टोन ठरणार गेमचेंजर?
हर्ष दुबेच्या समावेशामुळे SRH ला केवळ एक अचूक फिरकीपटूच मिळाला नाही, तर खालच्या फळीत बॅटिंगचा एक सक्षम पर्यायही उपलब्ध झाला आहे, ज्यामुळे टीमच्या संतुलनात मोठी सुधारणा होईल. दुसरीकडे, लेग-स्पिनर झिशान अंसारी हा मधल्या ओव्हर्समध्ये विकेट मिळवून देणारा हुकुमी एक्का ठरू शकतो. विजय हजारे ट्रॉफीमध्ये 21 विकेट्स घेऊन त्याने आपली क्षमता सिद्ध केली आहे. टीमने परदेशी खेळाडूंच्या कोट्यात लियम लिव्हिंगस्टोनला 13 कोटी रुपयांना खरेदी करून एक मोठी खेळी खेळली आहे. लिव्हिंगस्टोन हा केवळ एक स्फोटक बॅटर नाही, तर तो लेग-स्पिन आणि ऑफ-स्पिन दोन्ही टाकू शकतो.
गोलंदाजीच्या जोरावरही चॅम्पियन बनण्याचे स्वप्न
दरम्यान, सनरायझर्सकडे ऑलराऊंडरची कमतरता नाही पण स्पेशलिस्ट खेळाडू कमी असल्याने, खासकरून स्पिनर्स, त्यामुळे हैदराबादसाठी यंदाचं वर्ष देखील चॅलेन्जिंग असणार आहे. हैदराबादची टीम केवळ बॅटिंगच्या जोरावर नाही, तर गोलंदाजीच्या जोरावरही चॅम्पियन बनण्याचे स्वप्न पूर्ण करू शकते. त्यामुळे आता पॅट कमिन्सला आक्रमक रणनितीने मैदानात उतरावं लागेल.
