पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनु भाकर यांचे मामा आणि आजी स्कूटीवर प्रवास करत होते. अचानक एका ब्रेझा गाडीने त्यांना धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की दोघांचे जागीच निधन झाले. अपघात गाडी चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून चालकाचा शोध घेतला जात आहे.
150 कोटींना खरेदी केला बंगला, स्टॅम्प ड्युटी म्हणून सरकारला मिळाले इतके कोटी
advertisement
मनु भाकर यांचे मामा युद्धवीर हरियाणा रोडवेजमध्ये चालक म्हणून काम करत होते.रविवारी सकाळी ते स्कूटीवरून कामावर जात होते. त्यांच्या सोबत मनुची आजी सावित्री देखील होती. आजी सावित्री यांना त्यांच्या छोट्या मुलाच्या घरी जात होत्या.युद्धवीर हे त्यांना घेऊन दुचाकीवरून जात होते. कलियाणा वळणाजवळ पोहोचताच चुकीच्या बाजूने भरधाव वेगात येणाऱ्या ब्रेझा गाडीने त्यांना जोरदार धडक दिली. धडक एवढी तीव्र होती की गाडी रस्त्याच्या कडेला उलटली आणि मनु भाकर यांचे मामा आणि आजी यांनी घटनास्थळीच प्राण सोडले.
रोहित शर्माचा 20 सेकंदांचा सिक्रेट चॅट व्हिडिओ लीक; आगरकरला म्हणाला...
आम्हाला अपघाताची माहिती मिळाली असून कार आणि स्कूटीची धडक झाली आहे. स्कूटीवरील दोन्ही व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळावरून कारचा चालक सापडला नाही, असे पोलिस अधिकारी एएसआय सुरेश कुमार यांनी इंडिया टुडे या वाहिनीशी बोलताना सांगितले.
अव्वल नेमबाज असलेल्या मनुला काही दिवसांपूर्वीच राष्ट्रपतींच्या हस्ते खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.मनु भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकली होती. मनुने आशियाई क्रीडा स्पर्धा आणि आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत ७ पदके जिंकली आहेत.तर वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि वर्ल्डपकमध्ये तिच्या नावावर २१ पदके आहेत.