खंर तर पाकिस्तानने बांग्लादेशसमोर अवघं 136 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान बांग्लादेश सहज पुर्ण करून फायनलमध्ये पोहोचू शकली असती. धावांचा पाठलाग करताना बांग्लादेशची सुरूवात खराब झाली होती. कारण बांग्लादेशकडून शमीम होसेनने 30 सर्वाधिक धावा केल्या होत्या.त्याव्यतिरीक्त बांग्लादेशच्या इतर खेळाडूंना 20 धावांचा पल्लाही ओलांडता आला नाही. खरं तर हा सामना बांग्लादेशचा हातात होता. ते सहज आरामात या धावांचा पाठलाग करून सामना जिंकू शकले असते.पण एका मागून एक विकेट गमावत बांग्लादेश जिंकणारी मॅच हारली.
advertisement
पाकिस्तानचा डाव
प्रथम फलंदाजीला उतरलेल्या पाकिस्तानला बांग्लादेशच्या गोलंदाजीनी कसून गोलंदाजी करत धावा काढण्यापासुन रोखले होते.त्यामुळे धावा काढण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचे झटपट विकेट पडले आहेत. पहिल्यांदा भारताविरूद्ध अर्धशतक झळकावणारा साहिबजादा फरहान बांग्लादेश विरूद्ध फ्लॉप ठरला,तो अवघ्या 4 धावा करून बाद झाला. त्यानंतर आशिया कपमध्ये फ्लॉप ठरलेला सॅम अयुब डकवर बाद झाला.त्यांच्यानंतर चांगल्या लयीत खेळत असलेला फखर जमानही 13 धावांवर बाद झाला होता.
पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघाने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण तो देखील 19 धावांवर बाद झाला. हुसेन 3 धावावर आऊट झाला.पाकिस्तानच्या एकामागून एक विकेट पडत असताना त्यांना 100 ही धावा गाठता येत आहेत की नाही,असे वाटत होते. पण मोहम्मद हॅरीस आणि शाहिन आफ्रिदीने डाव सावरत पाकिस्तानचा डाव 100 च्या पार नेला होता. पण त्यानंतर मोहम्मद हॅरीस 31 तर शाहिन आफ्रीदी 19 धावा करून बाद झाला.यानंतर मोहम्मद नवाज मैदानात आला तो देखील 25 धावा करून बाद झाला. त्यानतर फहिमने शेवटच्या क्षणी 14 धावा केल्या आणि रौफच्या 3 धावा. या धावांच्या बळावर पाकिस्तानने 8 विकेट गमावून 135 धावा ठोकल्या आहेत.
बांग्लादेशने हा सामान हरून पाकिस्तानला फायनलमध्ये पाठवले आहे.त्यामुळे आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कप 2025 चा फायनल सामना पार पडणार आहे.