टीम इंडियाच्या बॉलर्सने सामना फिरवला
मॅचनंतर सलमान आगा म्हणाला, "ही एक चांगला मॅच होती, पण पॉवरप्लेमध्ये त्यांनी सामना आमच्यापासून दूर नेला. आम्ही दहा ओव्हर्सनंतर ज्या स्थितीत होतो, त्यावरून आम्ही 10 ते 15 रन्स अधिक करू शकलो असतो. 170 ते 180 चा स्कोर एक चांगला स्कोर आहे, पण टीम इंडियाच्या बॉलर्सने सामना त्यांच्या बाजूने फिरवला, असं म्हणत सलमान अली आगा याने शिवम दुबे आणि कुलदीप यादव यांच्यावर खापर फोडलं. पण पॉवरप्लेमध्ये भारताने चांगली बॅटिंग केली. तोच मॅचमधील मुख्य फरक होता, असंही सलमान यावेळी म्हणाला.
advertisement
सलमानने सांगितल्या सकारात्मक गोष्टी
सलमान पुढे म्हणाला, जेव्हा तुम्ही पाहता की बॉलर्स जास्त रन्स देत आहेत, तेव्हा तुम्हाला काहीतरी बदल करावा लागतो. टी-२० मध्ये हे असंच होतं. मॅचमध्ये अनेक सकारात्मक गोष्टी होत्या - ज्या प्रकारे फखरने बॅटिंग केली, फरहानने बॅटिंग केली आणि हॅरीने बॉलिंग केली. आता आम्ही श्रीलंकेविरुद्धच्या पुढच्या मॅचकडे लक्ष देत आहोत, असं म्हणत सलमानने पाकिस्तानची बाजू मांडली.
दरम्यान, मॅचनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत एका रिपोर्टरने सूर्यकुमारला विचारलं की, 'या वेळी पाकिस्तानचा संघ अधिक चांगला खेळला का?' या प्रश्नावर सूर्यकुमारने मजेशीर उत्तर दिलं. सूर्याने दिलेलं उत्तर सध्या व्हायरल होत आहे. तो म्हणाला, मला वाटतं की तुम्ही प्रतिस्पर्धेशी (राइव्हलरी) संबंधित प्रश्न विचारणं बंद करायला हवं. कारण प्रतिस्पर्धी तेव्हा असते, जेव्हा दोन्ही संघ 15 मॅच खेळतात आणि त्यात एक संघ 8-7 ने पुढे असतो. याला चांगला क्रिकेट किंवा प्रतिस्पर्धी म्हणतात, असं म्हणत सूर्याने पाकिस्तानला चिमटा घेतला.