पाकिस्तानी चाहत्यांनी गायले भारतीय राष्ट्रगीत
एका पाकिस्तानी चाहत्याने सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तो त्याच्या कुटुंबासोबत असल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये तो हृदयावर हात ठेवून उत्साहाने भारतीय राष्ट्रगीत गात आहे. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की मुली आणि त्याच्या शेजारी उभा असलेला एक वृद्ध पुरूष देखील राष्ट्रगीत गात आहे. पाकिस्तानी चाहते अशा प्रकारे भारतीय महिला संघाच्या विश्वचषक विजयाचा आनंद साजरा करताना दिसले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत; त्यांनी केकही कापला. याचा एक व्हिडिओही सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
advertisement
एका पाकिस्तानी चाहत्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हीच कौतुक केलं आहे. तसच त्याने भारतीय महिला क्रिकेट संघाला शुभेच्छाही दिल्या आहेत. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, मला आशा आहे एक दिवस तरुण पाकिस्तानी महिलादेखील हरमनप्रीत सारख्या मोठ्या होतील आणि चॅम्पियन बनतील.
भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवून महिला विश्वचषक जिंकला
आयसीसी महिला विश्वचषक 2025 चा अंतिम सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला. भारताने हा सामना 52 धावांनी जिंकला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर, टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 299 धावांचे लक्ष्य दिले. तथापि, दक्षिण आफ्रिका 246 धावांवर ऑलआउट झाली.
