TRENDING:

Smriti Mandhana Wedding : स्मृतीच्या लग्नाची नवी तारीख ठरली? पलाशची बहीण पहिल्यांदाच बोलली, दोन वाक्यात सगळंच सांगितलं!

Last Updated:

Palak Muchhal On Smriti Mandhana Wedding : पलाशच्या कुटूंबियांकडून प्रतिक्रिया येत असताना मानधना कुटूंबियांकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Smriti Mandhana Palash Muchhal Wedding : गायिका पलक मुच्छलने मोठं वक्तव्य केलंय. गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाची स्टार क्रिकेटर स्मृती मानधना हिल्या लग्नाची चर्चा सुरू आहे. स्मृतीच्या वडिलांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता दोघांची लग्नगाठ कधी बांधली जाणार? असा सवाल विचारला जात आहे. अशातच आता सोशल मीडियावर अनेक चर्चा होत असताना गायिका पलक मुच्छलने तिचा भाऊ पलाश मुच्छल आणि भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना यांच्या लग्नाबद्दल मौन सोडलं आहे.
Smriti Mandhana Wedding
Smriti Mandhana Wedding
advertisement

सकारात्मकतेवर विश्वास ठेवा - पलक मुच्छल

"मला वाटतं दोन्ही कुटुंबांनी खूप कठीण काळ अनुभवला आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे, मी पुन्हा एकदा सांगू इच्छिते की या काळात आम्हाला सकारात्मकतेवर विश्वास ठेवायचा आहे. आम्हाला शक्य तितकी सकारात्मकता पसरवायची आहे. आम्ही सर्वजण मजबूत राहण्याचा प्रयत्न करत आहोत," असं पलकने फिल्मफेअरला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

advertisement

पलाश प्रेमानंद महाराज यांच्या चरणी

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या चॅटनंतर पलाश मुच्छल वृंदावनला गेला. तिथं त्याने आध्यात्मिक गुरू प्रेमानंद महाराज यांचे आशीर्वाद घेतले. आध्यात्मिक गुरूंसोबतच्या त्यांच्या भेटीचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याआधी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता.

लवकरच लग्न होईल - पलाशची आई

advertisement

पलाशच्या कुटूंबियांकडून प्रतिक्रिया येत असताना मानधना कुटूंबियांकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. पलाशच्या आईने दोघांचं लवकरच लग्न होईल, अशी प्रतिक्रिया दिली होती.

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न कधी? 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांदा आणि सोयाबीनच्या भावात पुन्हा चढ-उतार, मक्याला किती मिळाला आज भाव?
सर्व पहा

दरम्यान, स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न 23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील सांगली येथे होणार होते. लग्नापूर्वीच्या तयारीचा सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू होती, परंतु लग्नाच्या दिवशी सकाळी अचानक एका आपत्कालीन घटनेमुळे हा सोहळा थांबला. दोन्ही कुटुंबांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पलक मुच्छल यांनी लग्न पुढे ढकलल्याची घोषणा केली.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Smriti Mandhana Wedding : स्मृतीच्या लग्नाची नवी तारीख ठरली? पलाशची बहीण पहिल्यांदाच बोलली, दोन वाक्यात सगळंच सांगितलं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल