खरं तर मध्यप्रदेशचा संघ प्रथम फलंदाजीला उतरला होता.यावेळी मध्यप्रदेश डावाची चांगली सुरूवात करेल असे वाटत होते. पण महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी सूरूवातीपासूनच भेदक गोलंदाजी करून एका मागून एक मध्यप्रदेशच्या फलंदाजांना आऊट करायला सूरूवात केली होती होती. पहिल्यांदा धोनीचा शिलेदार राजवर्धन हंगेरकर याने पहिल्यांदा हिमांशु मंत्री याला 8 धावांवर क्लिन बोल्ड केले.त्याच्यानंतर राजवर्धन हंगरगेकरने पुन्हा यश दुबेला सौरभ नेवालेच्या हातात कॅच देऊन त्याला बाद केले. अशाप्रकारे त्याने दोन्ही सलामीवीरांना गुंडाळलं.
advertisement
त्याच्यानंतर हंगरगेकर कर्णधार रजत पाटीदारला क्लिन बोल्ड करून स्वस्तास निपटवलं. त्याच्या जोडीला जलज सक्सेना देखील आला आणि त्याने शुभम शर्मा आणि व्यंकटेश अय्यरला बाद केले. त्यानंतर अर्शिल कुलकर्णीने अक्षत रघुवंशी आणि सारांश जैनला स्वस्तात बाद केले.यानंतर पुन्हा राजवर्धन हगरगेकरने कुमार कार्तिकेया आणि कुलदीप सेनची झटपट विकेट काढून मध्यप्रदेशचा डाव 187 धावांवर गुंडाळला.
महाराष्ट्राकडून राजवर्धन हंगरगेकर सर्वाधिक 5 तर अर्शिन कुलकर्णी आणि जलज सक्सेनाने प्रत्येकी 2 विकेट घेतले होते.
