India vs South Africa 5th T20i : अहमदाबादच्या मैदानावर भारताने साऊथ आफ्रिकेचा 30 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह भारताने पाच सामन्यांची टी20 मालिका 3-1 ने जिंकली आहे. या सामन्यात संजू सॅमसनची खेळीची प्रचंड चर्चा रंगली होती.विशेष म्हणजे तिकडे संजू बॅटींग करत असताना भारताचा माजी क्रिकेटर आणि समालोचक रवी शास्त्री यांनी निवड समितीला कडक शब्दात सुनावलं आहे.
advertisement
त्याचं झालं असं की टीम इंडियाचा उप कर्णधार शुभमन गिल मागच्या तीन सामन्यात फ्लॉप ठरला आहे. मात्र इतके सामने फ्लॉप ठरूनही संजू सॅमसनला संघात संधी दिली जात नव्हती.पण शुभमन गिलच्या पायाला दुखापत झाल्यामुळे आज संजू सॅमसनला पाचव्या टी20 सामन्यात संधी मिळाली होती. या संधीच सोनं करत आज संजू सॅमसनने अभिषेक शर्मासोबत भारताच्या डावाची वादळी सूरूवात केली होती.त्यामुळे त्याची ही खेळी पाहून अनेक चाहत्यांना गिलला बसवून संजूला संधी द्यावी,अशी मागणी होत आहे.
दरम्यान या सामन्यात संजू मैदानात खेळत असताना भारताचा माजी क्रिकेटर आणि समालोचक रवी शास्त्री यांनी मोठं विधान केलं आहे. संजूला असे शॉर्टस खेळताना पाहून, खरंच असं वाटतं की हा खेळाडू टीममध्ये का नव्हता? आणि एखाद्या खेळाडूला दुखापत झाल्यावरच त्याला संघात संधी दिली का जाते? असे सवाल रवी शास्त्रीने निवड समितीला विचारत सणसणीत चपराक हाणली आहे.
तसेच हा खेळाडू ओपनिंगसाठीच बनला आहे. टी20 मध्ये 3 शतक ठोकले आहेत. त्यातले दोन साऊथ आफ्रिकेविरूद्ध आहेत.त्यामुळे त्याची ही खेळी पाहून तो स्फोटक आणि डेंजर खेळाडू आहे,असे कौतुतक देखील रवी शास्त्री यांनी केले आहे.
