गुजरात टायटन्सने मोहम्मद सिराजचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.या व्हिडिओत मोहम्मद सिराज म्हणाला,सामन्यासाठी मी खुप उत्सुक आहे.कारण चिन्नास्वामीवर मी खूप आधीपासून खेळत आलो आहे. इथले फॅन्स ही खूप चांगले आहेत, खेळाडूंना चांगला पाठिंबा देतात.गुजरात टायटन्स नवीन फ्रेंजायची आहे. त्यामुळे संघातून मी पहिल्यांदाच खेळतोय. त्यामुळे थोडसं दडपण वाटतंय. पण बॉल हातात आल्यानंतर मी ट्रॅकवर येतो, असे तो सांगतो.
advertisement
गेल्या 7 वर्षापासून मी लाल जर्सी घालून या मैदानात खेळलोय. पण आज वेगळ्या कलरच्या जर्सीत मी मैदानात उतरणार आहे. त्यामुळे मजा येणार आहे.त्यामुळे आता चिन्नास्वामीमध्ये आवा दे ,असे चॅलेंज सिराजने रॉयल चॅलेजर्स बंगळुरूला दिले आहे.
हेड टू हेड
दरम्यान याआधी दोन्ही संघ पाच वेळा आमनेसामने आले आहेत. या काळात, आरसीबीने जीटीवर वर्चस्व गाजवले आहे. स्पर्धेत शेवटच्या वेळी दोन्ही संघ आमनेसामने आले होते, तेव्हा आरसीबीने जीटीचा ४ गडी राखून पराभव केला होता.
या हंगामात, नवीन कर्णधार रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली खेळणारा आरसीबी उत्तम फॉर्ममध्ये आहे. त्यांनी आतापर्यंत खेळलेले दोन्ही सामने जिंकले आहेत. तो सध्या पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. त्याच वेळी, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील जीटीने दोन सामने खेळले आहेत. जिथे त्यांना पहिल्या सामन्यात पंजाब किंग्जकडून ११ धावांनी पराभव पत्करावा लागला. पण दुसऱ्या सामन्यात जीटीने शानदार पुनरागमन केले आणि मुंबई इंडियन्सचा ३६ धावांनी पराभव करून विजयाचे खाते उघडले. तो पॉइंट्स टेबलवर चौथ्या स्थानावर आहे.
आयपीएलमध्ये आतापर्यंत आरसीबी आणि जीटी यांच्यात ५ सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी आरसीबीने ३ सामने जिंकले आहेत. तर जीटीने फक्त दोन सामने जिंकले आहेत. आयपीएल २०२४ मध्ये दोन्ही संघ दोनदा आमनेसामने आले होते. जिथे आरसीबीने दोन्ही सामने जिंकले होते. यापूर्वी, आरसीबीने नरेंद्र मोदी स्टेडियमवर जीटीचा ९ गडी राखून पराभव केला होता. यानंतर, दुसऱ्या सामन्यात त्यांनी बंगळुरूचा ४ गडी राखून पराभव केला.
