शेवटच्या ओव्हरमध्ये 16 रनची गरज असताना आशुतोष शर्माने पहिल्या बॉलला एक रन काढली आणि नेहल वढेराला स्ट्राईक दिली, यानंतर वढेराने दुसऱ्या बॉललाही एक रन काढली. आशुतोष शर्माने बांगलादेशचा बॉलर राकिब अल हसनच्या तिसऱ्या बॉलला सिक्स मारली, यानंतर चौथ्या बॉलला आशुतोषने बॉल लॉन्ग ऑफच्या दिशेने मारला, तेव्हा जिशानने हाततला कॅच सोडला आणि बॉल बाऊंड्री लाईनच्या बाहेर गेला, त्यामुळे भारताला चार रन मिळाल्या.
advertisement
उरलेल्या दोन बॉलमध्ये भारताला विजयासाठी 4 रनची गरज होती, तेव्हा पाचव्या बॉलला आशुतोष शर्माची विकेट गेली, त्यामुळे भारताला शेवटच्या बॉलला विजयासाठी 4 रन हवे होते, तेव्हा हर्ष दुबेने 3 रन काढले आणि मॅच सुपर ओव्हरमध्ये नेली. भारताकडून प्रियांश आर्याने 23 बॉलमध्ये 44 रनची खेळी केली, तर वैभव सूर्यवंशीने 15 बॉल 38 आणि जितेश शर्माने 23 बॉल 33 रन केले. नेहल वढेराने 29 बॉलमध्ये नाबाद 32 रनची खेळी केली. बांगलादेशकडून रकिबुल हसन, अबु हिदर रॉनी यांना 2-2 विकेट मिळाल्या. तर रिपोन मोंडल आणि अब्दुल गफर सकलेनला 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
आशिया कप रायजिंग स्टारच्या सेमी फायनलमध्ये पहिले बॅटिंग करणाऱ्या बांगलादेशने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 194 रन केल्या. या सामन्यात इंडिया ए चा कर्णधार जितेश शर्माने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर इंडिया ए च्या बॉलरनी 17व्या ओव्हरपर्यंत बांगलादेशला रोखलं, पण त्यानंतर त्यांनी आक्रमक बॅटिंग केली.
इनिंगच्या 19व्या ओव्हरला एसएम मेहरूबने नमन धीरला तब्बल 28 रन ठोकल्या, ज्यात 4 सिक्स आणि एका फोरचा समावेश होता. बांगलादेशकडून एसएम मेहरूबने 18 बॉलमध्ये 266.67 च्या स्ट्राईक रेटने 48 रन केल्या, यात 6 सिक्स आणि एका फोरचा समावेश होता. मेहरूबशिवाय ओपनर हबिबुर रहमान सोहन याने 46 बॉलमध्ये 65 रनची खेळी केली, यात त्याने 3 फोर आणि 5 सिक्स मारल्या. भारताकडून गुरजापनीत सिंग याने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या, याशिवाय हर्ष दुबे, सुयश शर्मा, रमणदीप सिंग आणि नमन धीर यांना एक-एक विकेट मिळाली.
