संघाची घोषणा करण्यासाठी शनिवारी मुंबईत पत्रकार परिषद झाली. त्याआधी दोघे हे विसरले असावेत की माईक ऑन आहे. यादरम्यान, रोहित अजीत आगरकरला बोलत होता की, या पत्रकार परिषदेनंतर सेक्रेटरीसोबत एक ते दीड तास बसावे लागेल. थोडी चर्चा करावी लागले. या सर्व गोष्टी... फॅमिली-व्हॅमिलीचा मुद्दा डिस्कस करण्यासाठी, आता सर्वजण मला म्हणत आहेत की... तोपर्यंत कोणी तरी आल्याने रोहित बोलायचे थांबला. बीसीसीआयने अलीकडेच खेळाडूंसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. ज्यामध्ये कुटुंबाशी संबंधित काही नवीन नियम बनवले गेले आहेत. रोहित याबद्दल आगरकरशी चर्चा करत होता. मात्र तो ही गोष्ट विसरला की माईकने सुरू आहे. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
advertisement
ब्लॅक वॉरंट म्हणजे काय? कधी आणि कोणा विरुद्ध काढले जाते, त्यावर कोण सही करते?
बीसीसीआयच्या नवीन नियमांबद्दल
बीसीसीआयने दोन दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या नवीन नियमांमध्ये एक नियम असा आहे की सर्व खेळाडूंना टीम बसमध्येच प्रवास करावा लागेल. म्हणजेच, दौऱ्यावर खेळाडू त्यांच्या कुटुंबासोबत प्रवास करू शकणार नाहीत. जर कोणी खेळाडू या नियमाचे उल्लंघन करताना सापडला, तर त्याला दंड भरावा लागेल. जर खेळाडूंना त्यांच्या कुटुंबासोबत वेगळा प्रवास करायचा असेल, तर त्यासाठी मुख्य प्रशिक्षक आणि निवड समितीच्या अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागेल. रोहित आणि अजीत आगरकर यांच्या 20 सेकंदांच्या या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे.
अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला; दिल्लीत प्रचार करताना दगड, विटा फेकल्या
रोहित-अगरकर यांचा संवाद
पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी रोहित शर्मा अजीत आगरकर यांच्याशी या नियमावर चर्चा करत होते. रोहित म्हणाला “मला अजून एक-दीड तास तिथे सेक्रेटरीसोबत बसावे लागेल, फॅमिलीचं डिस्कस करण्यासाठी. सगळे मला सांगत आहेत यार.” या संभाषणाचा 20 सेकंदांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा, पाहा कोणाला संधी मिळाली
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार) शुभमन गिल (उप-कर्णधार),विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा