खरं तर गुवाहाटीच्या बारसपारा स्टेडिअमवर दुसऱ्या टेस्ट सामन्यात साऊथ आफ्रिकाने 408 धावांनी भारताचा पराभव केला. या विजयासह साऊथ आफ्रिकने 2-0ने ही टेस्ट मालिका जिंकली आहे. विशेष म्हणजे भारताच्या भूमिवर मागच्या 25 वर्षातला दक्षिण आफ्रिकेचा पहिला टेस्ट मालिका विजय होता. या विजयाने भारतीय फॅन्सची मोठी निराशा झाली होती. या निराशेत रोहित शर्मा गूडन्यूज घेऊन आला होता.रोहित शर्मा पुन्हा एकदा जगातला नंबरचा फलंदाज बनला आहे. कारण रोहित शर्माने आयसीसीच्या वनडे बॅटींग रॅकींगमध्ये पुन्हा पहिल्या क्रमांकावर झेप घेतली होती.
advertisement
न्यूझीलंडच्या खेळाडूने टाकलं होत मागे
गेल्या बुधवारी न्यूझीलंडचा स्टार फलंदाज डेरी मिचेल याने रोहित शर्माला मागे टाकलं होतं. डेरी मिचेलने 782 गुणांसह अव्वल स्थान गाठलं होतं. डेरी मिचेलने वेस्ट इंडिजविरूद्ध 119 धावांची शतकीय खेळी केली होती. या शतकीय खेळीच्या बळावर त्याने 36 गुण मिळवून 782 गुणांसह रोहित शर्माची वनडे फलंदाजी क्रमावारीतली बादशाहात संपवली होती.
रोहित पुन्हा वनडेचा बादशाह
पण आता आठवड्याभरानंतर रोहित शर्मा पुन्हा एकदा वनडेचा बादशाह बनला आहे.कारण त्याने पुन्हा एकदा अव्वल स्थान गाठलं आहे. रोहित शर्मा आता 781 गुणांसह वनडे बॅटींग रॅकींगमध्ये अव्वल स्थानी आहे. तर डेरी मिचेल 766 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. रोहित व्यतिरीक्त टॉप 5 मध्ये शुभमन गिल 745 गुणांसह आणि चौथ्या तर विराट कोहली 725 गुणांसह पाचव्या स्थानी आहे.
