खरं तर रोहित शर्मा 9 मार्च 2025 ला शेवटचा वनडे सामना खेळला होता.त्यानंतर त्याने 7 महिन्यांनी ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पुनरागमन केलं होतं. यावेळी इतक्या महिन्यांच्या मैदानातील वापसीनंतर देखील त्याने मैदानात उत्कृष्ट खेळी केली होती. ऑस्ट्रेलिया विरूद्ध पहिल्या वनडे रोहित अवघ्या 8 धावांवर बाद झाला होता.त्यानंतर रोहितने दुसऱ्या वनडेत 73 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती. त्याचसोबत तिसऱ्या वनडे सामन्यात रोहितने 121 धावांची नाबाद शतकीय खेळी होती. या खेळीनंतरही रोहित शर्मा वनडे फलंदाजांच्या रॅकींगमध्ये अव्वल स्थानी होती. पण आता साऊथ आफ्रिकेविरूद्ध वनडे मालिकेआधी रोहित शर्माला झटका बसला आहे.
advertisement
ICC odi Batting ranking
न्यूझीलंडच्या खेळाडूने टाकलं मागे
न्यूझीलंडचा स्टार फलंदाज डेरी मिचेल याने रोहित शर्माला मागे टाकलं आहे. ज्यावेळेस रोहित शर्मा अव्वल स्थानी होता, त्यावेळेस डेरी मिचेल हा 746 गुणांवर आता त्याने 782 गुणांसह मिचेलने अव्वल स्थान गाठलं आहे. डेरी मिचेलने नुकतीच वेस्ट इंडिजविरूद्ध 119 धावांची शतकीय खेळी केली होती. या शतकीय खेळीच्या बळावर त्याने 36 गुण मिळवून 782 गुणांसह रोहित शर्माची वनडे फलंदाजी क्रमावारीतली बादशाहात संपवली आहे.
दरम्यान डेरी मिचेलने पहिले स्थान गाठल्यानंतर आता रोहित शर्माची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. रोहित शर्माच्या नावावर सध्या 281 गुण आहेत तर डेरी मिचेल 282 गुणांसह अव्वल स्थानी आहे. त्यामुळे अवघ्या एका गुणाने रोहित शर्माने अव्वल स्थान गमावलं आहे.आता रोहित शर्मा साऊथ आफ्रिके दौऱ्यात आपलं अव्वल स्थान पटकावत का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
