Rohit Sharma News : टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिज विरूद्ध टेस्ट मालिका खेळतेय. या मालिकेनंतर भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याला 19 ऑक्टोबरपासून सूरूवात होणार आहे. या दौऱ्यासाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माकडून वनडे कर्णधार पद काढून घेण्याल आलं. त्यामुळे रोहित शर्माला मोठा धक्का बसला आहे. या धक्क्यातून रोहित शर्मा सावरायचा प्रयत्न करत असतानाच आता त्याला दुसरा धक्का बसला आहे. त्यामुळे रोहित शर्माचा स्वप्नांचा चक्काचुर झाला आहे.
advertisement
खरं तर रोहित शर्माने टी20 आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.त्यामुळे रोहित शर्मा आता फक्त वनडे क्रिकेटमध्येच खेळताना दिसणार आहे. या फॉरमॅटमध्ये त्याला भारताला 2027 चा वर्ल्डकप जिंकून द्यायचं आहे, हे त्यांचं स्वप्न आहे. त्यामुळे त्याने वनडे फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली नव्हती.
आता रोहित शर्माकडून वनडेचा कर्णधार पद काढून घेण्यात आलं आहे.त्याच्या जागी शुभमन गिलला वनडेचा नवा कर्णधार बनवण्यात आलं आहे.त्यामुळे रोहित शर्मा आता खेळाडू म्हणून संघात खेळताना दिसणार आहे. पण 2027 वर्ल्ड कप रोहित शर्मा खेळणार का? या प्रश्नावर अजित आगरकरने जे उत्तर दिलं ते पाहून रोहितचं स्वप्न भंगण्याची शक्यता आहे.
रोहित शर्माच्या 2027 चा वर्ल्ड कप खेळण्याच्या मुद्यावर निवड समितीचा अध्यक्ष अजित आगरकर म्हणाला की, त्याच्या (रोहित शर्मा) 2027 च्या वनडे वर्ल्डकप खेळण्याच्या मुद्यावर अद्याप तरी बोलणे योग्य नाही. तसेच रोहित शर्मा आणि विराट कोहली हे 2027 वर्ल्ड कप खेळतील की नाही, हे निश्चित नाही, असे आगरकरने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कदाचित रोहित शर्माच वर्ल्ड कप जिंकण्याच स्वप्नही भंगण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा वनडे संघ :
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार) अक्षर पटेल, के एल राहुल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर) यशस्वी जयस्वाल
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा टी20 संघ :
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार) तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर) वरुन चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षदीप राणा, संजू सॅमसन (विकेटकीपर) रिंकु सिंग, वॉशिंग्टन सुंदर
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक
वनडे मालिका
१९ ऑक्टोबर: पहिला एकदिवसीय सामना, पर्थ
२३ ऑक्टोबर: दुसरा एकदिवसीय सामना, अॅडलेड
२५ ऑक्टोबर: तिसरा एकदिवसीय सामना, सिडनी
टी 20 मालिका
२९ ऑक्टोबर: पहिला टी२०, कॅनबेरा
३१ ऑक्टोबर: दुसरा टी२०, मेलबर्न
२ नोव्हेंबर: तिसरा टी२०, होबार्ट
६ नोव्हेंबर: चौथा टी२०, गोल्ड कोस्ट
८ नोव्हेंबर: पाचवा टी२०, ब्रिस्बेन