India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली आहे. ही मालिका 2-1 ने ऑस्ट्रेलियाने जिंकली आहे. ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉशची संधी होती, पण रोहित शर्माच्या शतकीय आणि विराट कोहलीच्या अर्धशतकीय खेळीमुळे ती हुकली होती. या मालिकेत रोहित शर्माने उत्कृष्ट खेळी केली. त्यामुळे त्याला प्लेअर ऑफ द सीरीजचा किताब मिळाला होता. या मालिकेनंतर आता रोहित शर्मा सिडनीवरून मुंबईच्या निघाला होता. दरम्यान सिडनी सोडण्याआधी रोहित शर्माने एक पोस्ट शेअर केली आहे.या पोस्टने चाहत्यांची धाकधूक वाढली आहे.त्यामुळे या पोस्टमध्ये काय आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
सिडनी सोडल्यानंतर लगेचच रोहित शर्माने एक भावूक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये रोहित शर्मा लिहतो की, 'पुन्हा एकदा शेवटचा निरोप घेतो सिडनी',असे त्याने म्हटले आहे. या पोस्टमुळे रोहित शर्मा निवृत्ती घेतोय की काय? असा चाहत्यांना प्रश्न पडला आहे. पण असे अजिबात नाही आहे, तर रोहित शर्माला ज्या ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी दौऱ्या दरम्यान प्रेम दिलं आणि पाठिंबा दर्शवला,त्या सर्व चाहत्यांचा त्याने निरोप दिला आहे. खरं तर या दौऱ्यानंतर पुन्हा ऑस्ट्रेलियात कधी येता येणार आहे? याची काहीच कल्पना नसल्याने त्याने अशी पोस्ट केली आहे.
दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत माजी भारतीय कर्णधार रोहित शर्माने शानदार कामगिरी केली.रोहित शर्मा या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने 101 च्या स्ट्राईक रेटने 202 धावा केल्या ज्यामध्ये एक शतक आणि एक अर्धशतक समाविष्ट आहे. रोहितने अॅडलेड ओव्हल येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 73 आणि सिडनीतील तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात नाबाद 121 धावा केल्या होत्या.
सिडनीमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात, हिटमॅनने केवळ त्याच्या संघाला विजय मिळवून दिला नाही तर संस्मरणीय शतकासह त्यांना क्लीन स्वीपपासून वाचवले होते.त्यामुळे मालिता 2-1 ने सुटली होती.
यासोबत सामन्यानंतर रोहित आणि कोहलीने अॅडम गिलख्रिस्ट आणि रवी शास्त्री यांच्याशी खास संवाद साधला होता. या दरम्यान रोहित म्हणाला, "ऑस्ट्रेलियात येऊन येथे खेळणे नेहमीच आनंददायी असते. 2008 च्या माझ्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. मला माहित नाही की आपण ऑस्ट्रेलियात परत येऊ की नाही. आपण कितीही कामगिरी केली तरी आपण आपल्या क्रिकेटचा आनंद घेतो. आपण पर्थमध्ये एक नवीन जीवन सुरू केले,असे रोहितने सामन्यानंतर सांगितले होते.
