ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या दिवशी मार्नस लाबुशनने सर्वाधिक ७२ धावा केल्या. तो शतक करेल असे वाटत असतानाच वॉशिंग्टन सुंदरने त्याला माघारी पाठवले. चांगली फलंदाजी करणाऱ्या लाबुशनने मैदानावर मात्र एक चुकीचे वर्तन केले ज्यासाठी भारताचा कर्णधार रोहित शर्माने लाइव्ह सामन्यात त्याला स्पष्ट शब्दात इशारा दिला.
विराटने टीम इंडियाला अडचणीत आणले, पाचव्या कसोटीतून विराट बाहेर होणार?
advertisement
मार्नस लाबुशेन फलंदाजी करत असताना नॉन स्ट्रायकर एंडवर पिचवर चालत होता. मॅच सुरू असताना पिचवर अशा प्रकारे चालण्यास मनाई असते. फलंदाजाच्या बुटातील स्पाइकमुळे खेळपट्टीवर छोटे खड्डे पडू शकतात. ज्यामुळे नंतर गोलंदाजीला येणाऱ्या संघाला फायदा मिळू शकतो. अशा गोष्टींकडे मैदानावरील अंपायर्सनी लक्ष दिले पाहिजे. मात्र लाबुशेनच्या या कृतीकडे त्यांचे लक्ष नव्हते.
भारताचा कर्णधार रोहित शर्माला ही गोष्ट लक्षात आली आणि तातडीने लाबुशनेला थांबवले तसेच इशारा दिला. रोहितने लाबुशेनला मर्यादेत राहण्याचा सल्ला दिला. या दरम्यान समालोचकांनी देखील लाबुशनेच्या या कृतीवर आक्षेप घेतला.
ही घटना घडली तेव्हा सुनिल गावस्कर आणि इरफान पठान समालोचन करत होते. धाव घेताना लाबुशेन आणि सॅम कोन्सटास दोघेही पिचवरून धावत होते. जेव्हा रोहित शर्मा लाबुशेनला ही गोष्ट सांगत होता तेव्हा अंपायर्स काहीच करत नव्हते असे गावस्कर म्हणाले.
