Virat Kohli: विराटने केली गंभीर चूक, पाचव्या कसोटीतून होऊ शकतो बाहेर, जाणून घ्या आयसीसीचे नियम

Last Updated:
sam konstas vs virat kohli
sam konstas vs virat kohli
मेलबर्न: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी कसोटी मेलबर्न येथे आज गुरुवारपासून सुरू झाली. ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने ६ बाद ३११ धावा केल्या. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने दमदार सुरूवात केली असली तरी जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीमुळे भारताला कमबॅक करता आले. चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी सर्वात जास्त चर्चा कशाची झाली असेल तर ती म्हणजे विराट कोहली आणि सॅम कोन्सटास यांच्यातील राडा होय.
ऑस्ट्रेलियाच्या डावातील १०व्या षटकात विराट कोहली आणि सॅम कोन्सटास यांच्यात वाद झाला. हे दोन्ही जवळून जाताना खांदे धडकले. त्यानंतर विराट आणि सॅम यांच्यात वाद झाला. हा वाद वाढेल असे वाटत असताना उस्मान ख्वाजाने हस्तक्षेप केला. तसेच अंपायरने विराटला शांत करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणावर भाष्य करताना रिकी पॉटिंग म्हणाला, याची सुरुवात विराटने केली. तो संपूर्ण पिचवरून चालत आला. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन म्हणाला, विराट कोहलीला चौकशीला सामोरे जावे लागू शकते. विराट लाइन बदलून गेला आणि त्याची सॅम सोबत धडक झाली.
advertisement
IND vs AUS: चौथ्या कसोटीच्या काही तास आधी जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम; अश्विनचा विक्रम धोक्यात
आयसीसीच्या नियमानुसार कोणताही खेळाडू अशा प्रकारचे वर्तन करू शकत नाही जे शारिरिक असेल. बेजबाबदारपणे किंवा मुद्दाम खेळाडू अन्य खेळाडू किंवा अंपायर्सशी शारिरीक संपर्क करू शकत नाही.
विराट आणि सॅम यांच्यात जी खांद्यांची धडक झाली ती आयसीसीच्या नियमानुसार लेव्हल टूचा गुन्हा आहे. विराट कोहलीला याचे गंभीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. यात ३ ते ४ डिमेरिट पॉइंट दिले जाऊ शकतात. विराटला जर ४ डिमेरिट पॉइंट मिळाले तर त्याच्यावर एक मॅचची बंदी घेतली जाऊ शकते. असे झाले तर नव्या वर्षातील पहिल्याच कसोटी सामन्याला त्याला मुकावे लागू शकते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवी आणि अखेरची कसोटी सिडनीत होणार आहे. चौकशीत विराटची चूक ही लेव्हल वनचा गुन्हा असल्याचे समोर आल्यास विराटला आर्थिक दंड केला जाऊ शकतो.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Virat Kohli: विराटने केली गंभीर चूक, पाचव्या कसोटीतून होऊ शकतो बाहेर, जाणून घ्या आयसीसीचे नियम
Next Article
advertisement
Kolhapur:  मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्ब, महायुतीचा तो आमदार कोण?
मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्
  • महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भ्रष्टाचाराच्या आरोपांनी कोल्हापूरचे राजकारण

  • खळबळजनक व्हिडिओ काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाची मोठी कोंडी झाली असल्याची चर्चा

View All
advertisement