Team India : शेवटच्या क्षणी वर्ल्ड कप टीममधून बाहेर का केलं? इंडियाच्या फिनिशरचे आगरकरवर खळबळजनक आरोप
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपला आता महिन्यापेक्षा कमी कालावधी उरला आहे. 7 फेब्रुवारीपासून टी-20 वर्ल्ड कपला सुरूवात होणार आहे.
मुंबई : टी-20 वर्ल्ड कपला आता महिन्यापेक्षा कमी कालावधी उरला आहे. 7 फेब्रुवारीपासून टी-20 वर्ल्ड कपला सुरूवात होणार आहे, पण त्याआधी भारतीय खेळाडूने निवड समिती प्रमुख अजित आगरकर आणि निवड समितीच्या इतर सदस्यांवर आरोप केले आहेत, त्यामुळे खळबळ माजली आहे. टीम इंडियाचा फिनिशर आणि विकेट कीपर जितेश शर्माला शेवटच्या क्षणी टी-20 वर्ल्ड कपच्या टीममधून बाहेर केलं गेलं. मुख्य म्हणजे नुकत्यात झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये जितेश भारतीय टीममध्ये होता.
निवड समितीने आपल्याला टीममधून बाहेर करत असल्याची माहिती आधी दिली नाही, असं जितेश म्हणाला आहे. 2025 मध्ये जितेश भारताकडून 7 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला. वर्ल्ड कपसाठी इशान किशनची टीममध्ये निवड झाल्यामुळे जितेश शर्माला वगळण्यात आले.
जितेश शर्माने पहिल्यांदाच टीममधून वगळल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. 'टी-20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी मी खूप मेहनत घेतली होती, पण नशिबाने जे ठरवले होते, ते मी नाकारू शकत नाही. त्यावेळी मी पूर्णपणे सुन्न झालो होतो, मला काहीही समजत नव्हतं', असं जितेश शर्मा म्हणाला आहे.
advertisement
'टीममधून मला बाहेर केलं गेलं, पण टीमची घोषणा होईपर्यंत मला याबाबत काहीही माहिती नव्हती. यानंतर मी कोच आणि निवड समिती सदस्यांसोबत बोललो, त्यांनी मला टीमबाहेर करण्याचं कारण सांगितलं, ज्यानंतर मी सहमत झालो', असं जितेश शर्मा म्हणाला आहे.
जितेश शर्मा हा आतापर्यंत भारतासाठी 16 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे, ज्यात त्याने 162 रन केल्या आहेत. 2023 मध्ये 7 टी-20 सामने खेळल्यानंतर त्याला 2024 मध्ये फक्त 2 मॅच खेळण्याची संधी मिळाली. आयपीएल 2025 मध्ये जितेशने आरसीबीकडून खेळताना उत्कृष्ट कामगिरी केली. आयपीएल 2025 मध्ये जितेशने 15 सामन्यांमध्ये 261 रन केले, त्यामुळे त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले. पण त्याचे पुनरागमन अल्पकाळ टिकले, कारण निवड समितीने जितेश ऐवजी इशान किशन आणि संजू सॅमसनला प्राधान्य दिले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 13, 2026 11:23 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : शेवटच्या क्षणी वर्ल्ड कप टीममधून बाहेर का केलं? इंडियाच्या फिनिशरचे आगरकरवर खळबळजनक आरोप







