रोहित शर्माचा प्रॅक्टिस व्हिडीओ
मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. ज्यामध्ये रोहित शर्मा बॅटिंगचा सराव करताना दिसतोय. मुंबईच्या इंडिन्सच्या ट्रेनिंगच्या ड्रेसमध्ये रोहित शर्मा आणि शार्दुल ठाकूर दिसत आहेत. शार्दुल ठाकूर आपल्या मित्राला म्हणजेच हिटमॅनला बॉलिंग टाकतो. रोहित शर्मा आपल्या बॅट स्विंगने बॉल फिरवलो अन् बॉल थेट स्टेडियममध्ये गेल्यातं पहायला मिळतंय. बॉल स्टेडियममध्ये गेल्यानंतर रोहित शर्मा शार्दुलला डिवचण्याचा प्रयत्न करतो.
advertisement
"कॅच इट.. कॅच इट... इन द स्टॅन्ड्स"
"कॅच इट.. कॅच इट... इन द स्टॅन्ड्स" असं रोहित शर्मा म्हणताना दिसतोय. त्यावेळी रोहितचे एक्सप्रेशन पाहण्याजोगे होते. शर्माचं हे वाक्य ऐकून शार्दुल गालातल्या गालात हसला अन् दोन्ही हात वर केले. दोघांचा हा मजेशीर व्हिडीओ पाहून अनेकांच्या हसू आवरलं नाही. मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केलाय. शाना आणि लॉर्ड यांची जुगलबंदी आताच सुरू झालीये, असं कॅप्टन मुंबई इंडियन्सने या व्हिडीओला दिलं आहे.
मुंबईच्या राजाचा टीजर रिलीज
दरम्यान, मुंबईच्या राजाच्या आगमनाचा मुंबईने एक टीजर रिलीज केला आहे. या टीझरमध्ये रोहित शर्माला दाखवण्यात आलं आहे. आणि त्यांच्या डोक्यावर ट्रॉफीचा ताज सजताना दाखवला आहे. टीझरच्या शेवटी रोहित शर्मा एका सिंहासनावर बसताना दिसत आहे. एकंदरीत रोहित शर्माच्या टीम मधील आगमनासाठी हा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. हा टीझर चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
