TRENDING:

Rohit Sharma Latest News: रोहित शर्माने पोस्ट केला भावूक व्हिडिओ; 45 मिनिटात आले 17,000 कमेंट अन् साडे सात लाख लाइक्स, पाहा काय म्हणाला...

Last Updated:
impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळत आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया सध्या २-१ने पिछाडीवर आहे. मेलबर्न कसोटीत भारताचा पराभव झाला होता. भारताच्या या दौऱ्यात सर्वाधिक चर्चे होत आहे ती म्हणजे कर्णधार रोहित शर्मा याच्या फॉर्मची होय.
News18
News18
advertisement

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटीसाठी रोहित शर्मा उपलब्ध नव्हता. त्यानंतर दुसऱ्या कसोटीपासून त्याने सूत्रे हाती घेतली. पण रोहितच्या नेतृत्वापेक्षा सर्वाधिक चर्चा होत आहे ती त्याच्या फलंदाजीची होय. रोहित फलंदाजीत सपशेल अपयशी ठरत आहे. अशात त्याने निवृत्ती घ्यावी किंवा रोहित आता कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार अशा चर्चा माजी क्रिकेटपटूंपासून ते चाहते करत आहेत.

advertisement

96 चेंडूत 170 धावा, टीम इंडियात आता तरी संधी मिळणार का? रोहितच्या जागेवर दावा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या कसोटीनंतर रोहित शर्मा काय निर्णय घेतोय याची सर्वांना उत्सुकता लागली असताना रोहितने इस्टाग्रामवर शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. रोहितने वर्षाच्या शेवटच्या दिवशी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत रोहितने २०२४ मधील विविध क्षणांचे व्हिडिओ छोट्या छोट्या भागामध्ये एकत्रपणे शेअर केले आहेत. हा व्हिडिओ पोस्ट करताना रोहित म्हणतो, For all the ups & downs, and everything in between, Thank you 2024.

advertisement

रोहितच्या या व्हिडिओला अवघ्या ४५ मिनिटात ७ लाख ७४ हजारहून अधिक लाइक्स आले आहेत. तर तब्बल १७ हजार हून अधिक कमेंट आल्या आहेत. रोहितच्या या पोस्टवर सर्व चाहते भावूक प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी तर त्याला निवृत्त होऊ नकोस अशी विनंती केली आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाहन ब्लॅकलिस्ट टाळायचंय? काय होतात त्याचे परिणाम? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

काही चाहत्यांनी रोहितला या कठीण काळातून तू पुन्हा भरारी घेशील असा दिलासा देखील दिला आहे. हिटमॅनच्या या पोस्टवर जगभरातील चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्याचे दिसत आहे. रोहितच्या या पोस्टमध्ये टी-२० वर्ल्डकपचे विजेपद, मुंबईतील स्वागतावेळी झालेली गर्दी, पत्नी राधिकासोबतचे खास क्षण, वर्षाच्या शेवटी नव्या मुलाचे झालेले स्वागत अशा अनेक गोड आठवणींना स्थान दिले आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma Latest News: रोहित शर्माने पोस्ट केला भावूक व्हिडिओ; 45 मिनिटात आले 17,000 कमेंट अन् साडे सात लाख लाइक्स, पाहा काय म्हणाला...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल