रोहित शर्माची नवीन लक्झरी कार
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रोहित शर्मा आपल्या नवीन लक्झरी कारमध्ये बसून ट्राफिकमधून बाहेर पडण्याची वाट पाहत आहे. त्याचवेळी, एका चाहत्याने त्याचा व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. चाहत्याला पाहून रोहितने लगेच हात वर करून त्याला अभिवादन केले, ज्यामुळे तो चाहता खूप आनंदी झाला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने पसरत आहे, आणि चाहत्यांच्या मते, रोहित शर्माने पुन्हा एकदा आपल्या विनम्र स्वभावाने सर्वांची मने जिंकली आहेत.
advertisement
मुंबईच्या ट्राफिकमध्ये अडकला तरीही...
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "रोहित शर्मा आपल्या नवीन लॅम्बोर्गिनीसह मुंबईच्या ट्राफिकमध्ये अडकला होता, तरीही त्याने आपल्या चाहत्याकडे हात हलवला. तो ट्रेनिंगनंतर घरी परत जात होता. रोहित शर्माचं हृदय सोन्याचं आहे."
रोहितच्या लॅम्बोर्गिनीची किंमत किती?
रोहित शर्माने नुकतीच आपली जुनी Urus कार बदलून नवीन लॅम्बोर्गिनी उरुस SE घेतली आहे. या आलिशान एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 4.57 कोटी रुपये आहे. लाल रंगाच्या या गाडीवर 3015 ही खास नंबर प्लेट आहे, जी त्याच्या कुटुंबाशी आणि क्रिकेट कारकिर्दीशी जोडलेली आहे. यापूर्वी त्याच्या गाडीचा नंबर 264 होता, जो त्याचा वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च स्कोर आहे. लॅम्बोर्गिनी उरुस SE ही एक शक्तिशाली कार आहे, जी फक्त 3.4 सेकंदात 0 ते 100 किमी/तास इतका वेग पकडू शकते.
रोहित शर्मा खेळताना कधी दिसणार?
दरम्यान, आयसीसी T20I वर्ल्ड कप 2024 जिंकल्यानंतर रोहित शर्माने T20I क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती, तर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी त्याने कसोटी क्रिकेटलाही अलविदा म्हटले होते. आता तो फक्त एकदिवसीय फॉर्मेटमध्ये खेळताना दिसेल. भारताचा पुढील सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑक्टोबर महिन्यात 3 मॅचच्या वनडे मालिकेत आहे, ज्यात रोहित शर्मा खेळण्याची शक्यता आहे.