आमच्याकडे तीन वेगळे स्पिनर...
सामना जिंकल्यानंतर आगा म्हणाला, "बॅटिंगमध्ये आम्हाला अजूनही सुधारणा करायची आहे. पण आमची बॉलिंग खूपच चांगली झाली, मी बॉलिंग युनिटवर खूप आनंदी आहे. आमच्याकडे तीन वेगळे स्पिनर आहेत, आणि त्यांच्यासोबत आयुबसहित आमच्याकडे 4-5 चांगले पर्याय आहेत, जे दुबई आणि अबू धाबीमध्ये मॅच खेळताना आवश्यक आहेत. त्यामुळे आम्ही आगामी सामन्यात चांगली कामगिरी करू, असं सलमान आगा म्हणाला."
advertisement
कोणत्याही टीमला हरवण्यासाठी सक्षम
"ज्या प्रकारे आम्हाला सुरुवाती मिळाली होती, त्यावरून आम्ही 180 धावा करायला पाहिजे होत्या, पण क्रिकेटमध्ये असं होतच असतंय. आम्ही सध्या खूप चांगला क्रिकेट खेळत आहोत, आम्ही ट्राय-सिरीज जिंकली आणि इथंही सहज विजय मिळवला. जर आम्ही आमच्या योजनांची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी केली, तर आम्ही कोणत्याही टीमला हरवण्यासाठी पुरेसे सक्षम आहोत.", असं म्हणत सलमान आगाने टीम इंडियाला चॅलेंज दिलं आहे.
पाकिस्तानच्या नाकपुड्या फुगल्या
दरम्यान, ओमान एक असा देश होता, ज्याने आशिया कपमध्ये कधीही पाऊल ठेवलं नाही. पाकिस्तानविरुद्ध ओमानने काल पहिला आशिया कपमधील सामना खेळला. लिंबूटिंबू टीमला हरवल्यानंतर पाकिस्तानच्या नाकपुड्या फुगल्या आहेत. तर सलमान ज्या ट्राय-सिरिजचा उल्लेख करतोय. ती ट्राय सिरीज अफगाणिस्तान, युएई आणि पाकिस्तान यांच्यात झाली होती, यावरून पाकिस्तानची टीम किती क्षमतेने खेळतीये, याचा अंदाज आला असेल.