स्मृतीच्या लग्नात मेडिकल एमरजन्सी
लग्न समारंभ सुरू असलेल्या ठिकाणी अचानक अॅम्ब्युलन्स दाखल झाल्याने उपस्थितांमध्ये मोठी खळबळ माजली. मिळालेल्या माहितीनुसार, विवाह सोहळ्यातील एका व्यक्तीला तातडीने उपचारासाठी नेण्यात आले आहे. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे नेमकं काय झालं असावं, याची चर्चा सुरू झाली. ही एक मेडिकल एमरजन्सी असल्याचं सांगण्यात आलं असून, संबंधित व्यक्तीला पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. मात्र, ही व्यक्ती नक्की कोण आहे किंवा त्यांना काय त्रास झाला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
advertisement
अद्याप कोणतंही स्पष्टीकरण नाही
दरम्यान, या प्रकारामुळे काही काळ सोहळ्याच्या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, तरीही नियोजित विधी सुरू असल्याचे समजते. आयोजक किंवा कुटुंबीयांकडून याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. सुरक्षिततेच्या आणि गोपनीयतेच्या कारणास्तव सध्या तरी या घटनेबद्दल गुप्तता पाळली जात आहे. चाहत्यांचे लक्ष मात्र आता या शाही लग्नासोबतच या अचानक घडलेल्या प्रकाराकडेही लागले आहे.
