TRENDING:

Sanju Samson : "...म्हणून मी राजस्थान रॉयल्स सोडलं", ना मालकासोबत भांडण ना इंटरनल पॉलिटिक्स! संजूने सांगितलं खरं कारण

Last Updated:

Sanju Samson On Rajasthan Royals : "मी राजस्थान रॉयल्स संघ सोडला, कारण त्या संघात माझा काळ आता संपला आहे, असं मला वाटलं होतं", असा खुलासा देखील संजू सॅमसनने केला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Why Sanju Samson Left Rajasthan Royals : टीम इंडियाला टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकून देणारा स्टार विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन आता यंदाच्या आयपीएल हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसणार आहे. संजूने मागील आयपीएलनंतर राजस्थान रॉयल्स संघाची साथ सोडली असून संजू आता सीएसकेमध्ये सामील झालाय. त्यामुळे आता चेन्नईच्या फॅन्सची उत्सुकता शिगेला पोहोचलीये. अशातच आता संजूचा राजस्थानच्या मालकासोबत वाद होता, अशी चर्चा सुरू झाली होती. त्यावर आता संजूने मोठं वक्तव्य केलं. त्याने राजस्थान सोडण्यामागील खरं कारण सांगितलं.
Sanju Samson Reveal Reason Why he Left Rajasthan Royals
Sanju Samson Reveal Reason Why he Left Rajasthan Royals
advertisement

भावनांना स्वतःवर वरचढ होऊ देत नाही - संजू सॅमसन

संजू सॅमसनला 2018 मध्ये राजस्थानला खरेदी केलं होतं. राजस्थानने त्याला संधी दिली अन् त्याने संधीचं सोनं केलं. राजस्थानकडून त्याने एक दोन नव्हे तर तब्बल 7 वर्ष खर्च केली आहेत. अशातच मागील आयपीएलपूर्वी रविंद्र जडेजाच्या जागेवर संजूला रिप्लेस केलं गेलं. त्यानंतर आता राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळण्याची ही माझी पहिलीच वेळ असेल. मात्र, मैदानावर असताना मी माझ्या भावनांना स्वतःवर वरचढ होऊ देत नाही, असं संजू सॅमसन म्हणाला आहे.

advertisement

"मी राजस्थान रॉयल्स संघ सोडला, कारण..."

मी राजस्थान रॉयल्स संघ सोडला, कारण त्या संघात माझा काळ आता संपला आहे, असं मला वाटलं होतं, असा खुलासा देखील संजू सॅमसनने केला. आता जरी आमची त्यांच्याशी गाठ पडली, तरीही मी माझे सर्वोत्तम क्रिकेट खेळेन, असं आश्वासन संजूने चेन्नई सुपर किंग्जच्या फॅन्सला दिलंय. संजू चेन्नईकडून ओपनिंग आणि विकेटकीपिंग देखील करताना दिसेल.

advertisement

IPL 2026 : वर्ल्ड कपचं गिफ्ट मिळणार? संजू सॅमसन होणार CSK चा कॅप्टन? 'चेता'ने दोनच वाक्यात विषय संपवला!

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रेडलाईट एरियातलं ‘ते’ दृश्य पाहिलं, केरळच्या लीला ईसोंना ठरवलं, नागपुरात मोठं काम, Video
सर्व पहा

दरम्यान, संजू सॅमसन टीममध्ये आल्याने आता चेन्नईच्या संघात टेन्शनचं वातावरण आहे. कॅप्टन्सी नेमकी कुणाला मिळणार? असा सवाल विचारला जात होता. अशातच संजूने कॅप्टन्सीच्या चर्चांना फुल स्टॉप दिला आहे. माझं मुख्य ध्येय टीम मॅनेजमेंट आणि माही भाईने त्याच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणं आहे, असं संजू सॅमसन म्हणाला. धोनीसोबत अनेकदा चर्चा झाली असली तरी, प्रत्यक्ष मैदानात त्याच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याची ही पहिलीच वेळ असेल. या संधीतून खूप काही शिकायला मिळेल, असा विश्वासही संजू सॅमसनने व्यक्त केला आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Sanju Samson : "...म्हणून मी राजस्थान रॉयल्स सोडलं", ना मालकासोबत भांडण ना इंटरनल पॉलिटिक्स! संजूने सांगितलं खरं कारण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल