शाय होप आयसीसीच्या सगळ्या फूल मेंबर्स टीमविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक करणारा जगातला पहिला खेळाडू बनला आहे. होपने सगळ्या 11 फुल मेंबर देशांविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक ठोकलं आहे. याआधी कोणत्याही खेळाडूला अशी कामगिरी करता आली नाही. होपने भारत, इंग्लंड, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, आयर्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकं केली आहेत.
advertisement
होपची कोणत्या टीमविरुद्ध किती शतकं?
4 vs भारत (41 इनिंगमध्ये)
4 vs इंग्लंड (57 इनिंगमध्ये)
3 vs बांग्लादेश (31 इनिंगमध्ये)
2 vs पाकिस्तान (23 इनिंगमध्ये)
2 vs श्रीलंका (29 इनिंगमध्ये)
1 vs झिम्बाब्वे (7 इनिंगमध्ये)
1 vs दक्षिण अफ्रीका (10 इनिंगमध्ये)
1 vs अफगानिस्तान (12 इनिंगमध्ये)
1 vs आयरलैंड (13 इनिंगमध्ये)
1 vs न्यूजीलैंड (19 इनिंगमध्ये)
1 vs ऑस्ट्रेलिया (24 इनिंगमध्ये)
गेल-लारालाही मागे टाकलं
शाय होपचं वनडे क्रिकेटमधलं हे 19वं शतक होतं, याचसोबत त्याने क्रिस गेल आणि ब्रायन लारालाही मागे टाकलं आहे. होपने फक्त 142 इनिंगमध्ये 6 हजार वनडे रन पूर्ण केल्या आहेत. वेस्ट इंडिजकडून सगळ्यात जलद 6 हजार रन करणारा होप दुसरा खेळाडू ठरला आहे. वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांनी 141 वनडे इनिंगमध्ये 6 हजार रनचा टप्पा ओलांडला. लाराला 6 हजार वनडे रन पूर्ण करायला 155 इनिंग लागल्या होत्या.
वेस्ट इंडिजकडून वनडेमध्ये सगळ्यात जलद 6 हजार रन
विवियन रिचर्ड्स – 141
शाय होप – 142
ब्रायन लारा – 155
डेसमंड हेन्स – 162
क्रिस गेल – 166
