आगामी T20 वर्ल्ड कपमध्ये मी खेळणार - शशांक सिंग
"तुम्ही जर मला संघाबद्दल विचाराल, तर पंजाब पुढच्या वर्षीचा IPL नक्कीच जिंकणार आहे," असा ठाम विश्वास शशांकने व्यक्त केला. तसेच, त्याने दुसरे एक मोठी भविष्यवाणी केली आहे. "भारतात होणाऱ्या आगामी T20 वर्ल्ड कपमध्ये मी खेळणार आणि संघाला मॅच जिंकवून देणार. हे कसे होईल हे मला माहीत नाही, पण मला खात्री आहे की ते नक्की होईल.", असंही शशांक म्हणतो.
advertisement
रिकी सर अचूकपणे समजून घ्यायचे - शशांक सिंग
शशांकच्या मते, प्रत्येक प्लेअरची स्वतःची एक 'रिदम' असते आणि इतक्या वर्षांनंतर त्याला आता आपला खेळ चांगला समजला आहे. IPL हे 'हाय-प्रेशर' टूर्नामेंट आहे, जिथे मॅच नसतानाही प्रत्येकावर थोडा दबाव असतो. नेटमध्ये फलंदाजी करताना काही बॉल चुकले किंवा काही शॉट्सचा टायमिंग चुकला, तरी स्वतःवर अधिक दबाव येतो. तो नेटमध्ये खराब शॉट खेळल्यास खेळलेल्या चांगल्या शॉट्सऐवजी त्याच एका शॉटचा विचार करू लागतो, आणि हेच रिकी सर अचूकपणे समजून घ्यायचे, असंही शशांक सिंगन म्हटलं आहे.
सूर्यकुमार यादव सांगितलं होतं...
दरम्यान, शशांक सिंगने म्हटलंय की, सूर्यकुमार यादव यांनी मला एकदा सांगितले होतं की, जो प्लेअर 6 आणि 7 नंबरवर फलंदाजी करतो, त्याला सर्वात जास्त जोखले जाते." शशांकच्या मते, "तुम्ही अपयशी होण्याची शक्यता अधिक असते, कारण तुम्ही जोखीम सर्वात जास्त घेत असता, त्यामुळे मला जास्त जोखीम घ्यायला आवडते, असं शशांक सिंग म्हणाला.