Shoaib Akhtar काय म्हणाला?
स्पिन भारतीय फलंदाजांची ताकद राहिली आहे. अशावेळी त्यांच्या विरोधात जास्त स्पिनर्स खेळवणं ही स्वत:च्या पायावर कुऱ्हाडी चालवण्यासारखं आहे. ही पक्की टीम इंडिया आहे, ते स्पिन गोलंदाजी चांगल्या पद्धतीने खेळू शकतात. पाकिस्तानची कामगिरी पाहून मी आवाक झालो आहे. माझं मन दुखवलं गेलं आहे. काय बोलावं मला कळेना झालंय. पण टीम इंडियाने चांगली कामगिरी केली. वेल डन... पण या मॅचला तुम्ही पॉलिटिकल बनवू नका, असं शोएब अख्तर म्हणाला.
advertisement
हँडशेक करा आणि तुमची प्रतिष्ठा दाखवा
आम्ही तुमच्याबद्दल चांगल्या गोष्टी देखील करत आहोत ना... लढाया होत राहतील पण याचा हा अर्थ नाही की, तुम्ही क्रिकेटला या स्थरावर घेऊन जाल, असं म्हणत शोएक अख्तर याने पुन्हा आपली गरळ ओकली आहे. क्रिकेट हा खेळ आहे, हँडशेक करा आणि तुमची प्रतिष्ठा दाखवा, असं म्हणत शोएब अख्तर याने खुन्सी मत व्यक्त केलं आहे. पाकिस्तानचा कॅप्टन सलमान अली आगा याने अगदी योग्य पाऊल उचललं. सलमान पोस्ट मॅच प्रेझेन्टेशनला आला नाही, हे त्याने योग्य केलं, असंही अख्तर म्हणाला.
टीव्ही अँकरला शब्द फुटेना
दरम्यान, पाकिस्तानी न्यूज शोमध्ये शोएब अख्तर याच्यासह इतर क्रिडातज्ज्ञ देखील उपस्थित होते. शोएब अख्तर मनोभावे बोलत होता की, टीव्ही अँकरला देखील काही शब्द फुटले नाहीत. ती देखील शोएब अख्तरकडे बघत राहिली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.