Sania Mirza Ex Husband Shoaib Malik Divorce : भारताची टेनिसपट्टू सानिया मिर्झा हिने काडीमोड घेतलेल्या पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकचा तिसऱ्यांदा घटस्फोट झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे. शोएब मलिकने वर्षभरापूर्वीच सना जावेदशी लग्न केलं होतं. पण आता हे लग्न देखील मोडल्याचे समजते.त्यामुळे शोएब मलिकने आएशा सिद्दीकी, सानिया मिर्झानंतर आता सना जावेदला फसवल्याची चर्चा आहे. पण दोघांनी अद्याप या वृत्ताला दुजोरा दिला नाही आहे.
advertisement
सानिया मिर्झाचा घटस्फोटीत पती शोएब मलिक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शोएब मलिक तिसऱ्यांदा घटस्फोट घेत असल्याची माहिती समोर आली आहे.पाकिस्तानी मीडियाच्या वृत्तानुसार, 2024 मध्ये सानासोबत लग्न करणारा शोएब मलिक तिच्याशी घटस्फोट घेण्याच्या तयारीत आहे. खरं तर दोघांचं नात फारस चांगल्या वळणार नाही आहे. त्यामुळे ते लवकरच एकमेकांपासून विभक्त होण्याची घोषणा करू शकतात,अशी माहिती समोर येत आहे.
खरं तर शोएब मलिक आणि सानिया मिर्झाच लग्न 14 वर्ष टीकलं होतं. त्यानंतर दोघेही वेगळे झाल्यानंतर शोएबने जानेवारी 2024 मध्ये सना जावेदसोबत नात्यात असल्याच्या बातमीला दुजोरा देऊन सर्वांना चकित केले होते. या दरम्यान पाकिस्तान सूपर लीगमध्ये सामन्यांदरम्यान स्टँडवरून सना जावेद शोएब मलिकचा चीअर करताना दिसली होती. त्यामुळे दोघे नात्यात असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.पण आता दोघांमध्ये खटके उडाल्याची माहिती समोर आली आहे.
सना आणि शोएब एकमेकांना टाळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्यांना वेग आला. व्हायरल क्लिपमध्ये, शोएबला ऑटोग्राफ देताना दिसत आहे तर सना तिचा चेहरा तिच्या पतीपासून दूर ठेवते आणि ते जास्त संवाद साधत नाहीत. हा व्हिडिओतल दृष्ट पाहून दोघांमध्ये काहीतरी वेगळे सूरू असल्याचे बोलले जात आहे. तर पती-पत्नीमधील सामान्य भांडण असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणण आहे.पण अद्याप तरी शोएब आणि सना या दोघांनी या वृत्ताला दुजोरा दिला नाही आहे.
पाकिस्तानसाठी मलिकचा विक्रम
2007 च्या टी20 विश्वचषकात पाकिस्तानला अंतिम फेरीत नेणाऱ्या 43 वर्षीय मलिकने आतापर्यंत ग्रीनमध्ये पुरुषांसाठी एकूण 35 कसोटी, 287 एकदिवसीय आणि 124 टी20 सामने खेळले आहेत. त्याने पाकिस्तानी संघासाठी कसोटीत 1898 धावा, एकदिवसीय सामन्यात 7534 धावा आणि टी20 स्वरूपात 2435 धावा केल्या आहेत. याशिवाय, त्याने कसोटीत 32, एकदिवसीय सामन्यात 158 आणि टी20 सामन्यात 28 बळी घेतले आहेत.मलिकने शेवटचा पाकिस्तानकडून 20 नोव्हेंबर 2021रोजी मीरपूर येथे झालेल्या टी20 सामन्यात बांगलादेशविरुद्ध खेळला होता.