ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संधी देणार का?
श्रेयस अय्यर याने काही महिन्यांसाठी रेड बॉल क्रिकेटमधून विश्रांची घेतली आहे. श्रेयसने बीसीसीआयला याबाबत मेलद्वारे माहिती दिली आहे. श्रेयसने रेड बॉल क्रिकेटच्या हिशोबाने माझी फिटनेस नसल्याचं बीसीसीआयला कळवलं आहे. त्यामुळे आता बीसीसीआय निवड समिती श्रेयसला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संधी देणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 3 एकदिवसीय आणि 5 टी 20i सामने खेळणार आहे.
advertisement
आशिया कपमध्ये डावललं, ऑस्ट्रेलियाला नेणार?
श्रेयस अय्यर गेल्या दोन वर्षापासून चांगल्या फॉर्ममध्ये आहे. श्रेयस अय्यरने टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून दिली होती. तर पंजाब किंग्जसाठी श्रेयसने अफलातून कामगिरी केली होती. मात्र, आशिया कपसाठी श्रेयसला संधी मिळाली नाही. अशातच आता ऑस्ट्रेलियाच्या वनडे आणि टी-ट्वेंटी मालिकेसाठी श्रेयस अय्यरला संधी दिली जाणार का? असा सवाल विचारला जात आहे.
श्रेयस अय्यरच्या टीमचा पराभव
दरम्यान, भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी खेळवण्यात आला ज्यामध्ये श्रेयस अय्यरच्या संघाचा 9 विकेट्सने पराभव झाला. श्रेयस अय्यर भारत अ संघाच्या कॅप्टन्सीची जबाबदारी पार पाडत आहे. पाहुण्या संघाने मालिकेत पुनरागमन केलं आणि 1-1 अशी बरोबरी साधलीय.