प्लीहाचे कार्य काय, दुखापत जीवघेणी आहे का?
मूठभर आकाराचा हा अवयव बरगड्यांखाली डाव्या बाजूला असतो. रक्त शुद्ध करणे आणि जंतुसंसर्गापासून संरक्षण करणं हे त्याचे कार्य आहे. सन 1982 मध्ये 'कुली' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अमिताभ बच्चन यांनाही प्लीहेची दुखापत झाली होती. अमिताभ बच्चन यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया आणि रक्त बदलून उपचार करण्यात आले होते. एवढंच नाही तर अमिताभ बच्चन कोमात देखील गेले होते. त्यानंतर दोन महिने त्यांना रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं.
advertisement
प्लीहाच्या दुखापतीची लक्षणे काय आहेत?
प्लीहाला झालेली दुखापत बाहेरून दिसत नाही. अंतर्गत रक्तस्रावामुळे खूप तीव्र वेदना होतात. ओकारी येणे, चक्कर येणे, रक्तदाब कमी होणे आणि हृदयाचे ठोके जलद होणे ही लक्षणे दिसतात. प्रामुख्याने ब्लड प्रेशर चेक केल्यानंतर लगेच प्लीहाची दुखापत लक्षात येऊ शकते. हा हा अतिशय नाजूक आणि रक्तवाहिन्यांनी भरलेला (Highly Vascular) अवयव आहे. त्याचे मुख्य काम रक्त फिल्टर करणे आणि शरीराला इन्फेक्शन (संसर्ग) शी लढण्यास मदत करणे आहे. प्लीहा रक्तवाहिन्यांनी भरलेला असल्यामुळे, लॅसरेशन झाल्यास शरीराच्या आत रक्तस्राव (Internal Bleeding) सुरू होतो. हा रक्तस्राव जर जास्त झाला तर तो जीवघेणा ठरू शकतो.
श्रेयसची प्रकृती सध्या स्थिर
दरम्यान, बीसीसीआयने (BCCI) दिलेल्या माहितीनुसार, श्रेयसची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत. वैद्यकीय पथकाच्या तातडीच्या ऍक्शनमुळे संभाव्य मोठा धोका टळल्याचे बोलले जात आहे. सध्या श्रेयसला आयसीयूमधून सामान्य वॉर्डमध्ये हलवण्यात आले असून, तो सुमारे एक आठवडा रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहणार आहे. या दुखापतीमुळे श्रेयस दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी वनडे मॅचमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे.
