श्रेयस अय्यरचे टी-20 संघात पुनरागमन
न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात श्रेयस अय्यर आणि रवी बिश्नोई यांचा समावेश करण्यात आला आहे. वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाल्यामुळे त्याच्या जागी बिश्नोईला संधी मिळाली आहे. सुंदरला पहिल्या वनडे दरम्यान बरगड्यांच्या स्नायूंत दुखापत झाली होती, त्यामुळे तो पूर्ण मालिकेतून बाहेर झाला आहे. दुसरीकडे, तिळक वर्माला देखील दुखापत झाल्याने श्रेयस अय्यरचे टी-20 संघात पुनरागमन झाले असून तो पहिल्या 3 सामन्यांसाठी उपलब्ध असेल.
advertisement
वॉशिंग्टन सुंदरला विश्रांती
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, वॉशिंग्टन सुंदर सध्या विश्रांती घेणार असून त्यानंतर तो बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये (COE) उपचारासाठी हजर होईल. तिलक वर्माला पोटाच्या विकारावर शस्त्रक्रिया करावी लागल्याने श्रेयस अय्यरला ही संधी मिळाली आहे. या मालिकेतील पहिला मॅच 21 जानेवारी रोजी नागपूर येथे खेळवला जाणार आहे. वर्ल्ड कपपूर्वीची ही शेवटची मालिका असल्याने श्रेयस आणि बिश्नोईसाठी ही स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी असेल.
भारतीय संघ: सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर (पहिले 3 सामने), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, रिंकू सिंह, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, इशान किशन, रवी बिश्नोई.
