विराटला रणजी ट्रॉफी खेळायला लावणार?
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर आता एक महिन्याच्या गॅप आहे. तर मग विराट कोहलीला रणजी ट्रॉफी किंवा इतर स्पर्धा खेळण्यास बॅटिंग कोच किंवा तुमच्याकडून काही सांगण्यात आलंय का? जेणेकरून बॅटर फॉर्ममध्ये राहू शकतो, असा प्रश्न शुभमन गिलला पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. त्यावर शुभमनने सावध उत्तर देणं पसंत केलं.
advertisement
त्यावेळेस निर्णय घेतला जाईल - शुभमन गिल
आतापर्यंत असं कोणतंही बोलणं आमच्यात झालं नाहीये. पण साऊथ आफ्रिका सिरीजनंतर इंटरनॅशनल मॅचमध्ये मोठा गॅप आहे. त्यानंतर मध्ये एक न्यूझीलंडविरुद्ध सिरीज आहे. त्यावेळी आम्ही विचार करू की प्लेयर्सला इन फॉर्म कसं ठेवायचं. मला वाटतं की त्यावेळेस निर्णय घेतला जाईल, असं शुभमन गिल प्रेस कॉनफरेन्समध्ये म्हणाला आहे.
विराट कोहलीच्या कामगिरीबद्दल कौतुक
दरम्यान, भारताचा कर्णधार शुभमन गिल याने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचं कौतुक केलं आणि संघाला मार्गदर्शन करण्यात त्यांच्या वरिष्ठ भागीदारीचा प्रभाव देखील होता, असं देखील म्हटलं आहे. स्वतःच्या फलंदाजीवर विचार करताना, गिल अलिकडच्या सुरुवातींमध्ये शांत राहिला, वैयक्तिक धावांपेक्षा संघाच्या योगदानावर भर दिला. त्याने हर्षित राणाच्या ऑलराऊंडर प्रयत्नांचे कौतुक केलं आहे.
