दोघांची लहान मुलांसारखी हाणामारी
टीम इंडियाचं प्रॅक्टिस सेशन चालू होतं. त्यावेळी शुभमन गिल, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव आणि इतर खेळाडू फुटबॉल खेळत होते. त्यावेळी अभिषेकच्या टीमने गोल केला. त्यावेळी त्याने भन्नाट सेलीब्रेशन केलं. सूर्याने देखील याला हसून दाद दिली. त्यानंतर शुभमन आणि अभिषेक यांच्यात एका मुद्द्यावरून बिनसलं. त्यानंतर मस्करीत दोघांनी लहान मुलांसारखं हाणामारी केली. त्याचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे.
advertisement
पाहा Video
टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार शुभमन गिल बॅटिंगमध्ये संघर्ष करत आहेत. सूर्यकुमार यादव हा भारताच्या टी-20 क्रिकेटच्या इतिहासातला सर्वाधिक रन करणारा तिसरा खेळाडू आहे. पण यावर्षी सूर्याची टी-20 क्रिकेटमधली कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. शुभमन गिल आशिया कपमध्येही रन करण्यात अपयशी ठरला. 21 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात गिलने 28 बॉलमध्ये 47 रनची खेळी केली, त्याशिवाय गिलला कोणतीही उल्लेखनीय कामगिरी करता आली नाही.
टीम इंडियाचा स्कॉड - सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, संजू सॅमसन, वॉशिंगटन सुंदर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, रिंकू सिंग.
टी-ट्वेंटी सामन्यांचं शेड्यूल
दरम्यान, टीम इंडियाचा सीरिजचा पहिला सामना 29 ऑक्टोबरला तर पुढील 4 सामने 31 ऑक्टोबर, 2 नोव्हेंबर, 6 नोव्हेंबर आणि 8 नोव्हेंबरला होतील. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.45 वाजता सुरू होईल. या सामन्यात काही अंशी पावसाची देखील शक्यता आहे.
