शुभमन फिजिओसह मैदानाबाहेर
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी शनिवारी सराव करताना शुभमन गिलच्या हाताला दुखापत झाली. यादरम्यान, फिजिओ त्याच्याकडे धावले आणि त्याच्यावर उपचार केले. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य प्रशिक्षक गिलशी बोलताना दिसला होता. त्यामुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये गोंधळ उडाल्याचं पहायला मिळालं होतं. टाईम्स ऑफ इंडिया (टीओआय) च्या वृत्तानुसार, गिल संघाच्या फिजिओसह मैदानाबाहेर जाताना दिसला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये गिल नेटमध्ये सराव करताना जखमी झाल्यानंतर वेदनेने वेदनेतून बाहेर पडताना दिसत आहे. चेंडू त्याच्यावर आदळताच फिजिओ बर्फाचा डबा घेऊन धावताना दिसला.
advertisement
गिल पुन्हा मैदानात
मिडिया रिपोर्टनुसार समोर आलेल्या अहवालानुसार, शुभमनला जास्त वेदना झाल्या नाहीत. सराव दरम्यान चेंडू त्याच्यावर हलका लागला ज्यामुळे त्याला किरकोळ दुखापत झाली. अहवालात असे सांगण्यात आलं आहे की दुखापतीनंतर काही मिनिटांनी गिलने पुन्हा सराव सुरू केला. मात्र, त्यानंतर देखील सर्वजण त्याच्यावर लक्ष ठेऊन होते. त्यामुळे शुभमन पाकिस्तानविरुद्ध खेळेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
अभिषेक शर्मा तातडीने धावला
दरम्यान, शुभमनला दुखापत झाल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर गिलशी बोलताना दिसले. शुभमनचा सलामीचा साथीदार अभिषेक शर्मा त्याच्यासोबत राहिला. हाताला दुखापत झाल्यामुळे अभिषेकने शुभमनला पाण्याची बाटली उघडण्यास मदत केली. त्यामुळे शुभमनची दुखापत गंभीर देखील मानली जात आहे.