TRENDING:

स्मृतीने पलाशला कोरिओग्राफर मुलीसोबत रेड हँड पकडलं? बॉलिवूड अभिनेत्याचा खळबळजनक दावा! 'लग्नासाठी फक्त तो...'

Last Updated:

Palash Muchhal Cheat Smiriti Mandhana : स्मृती आणि पलाश यांचं लग्न पुढं ढकलण्याच्या घोषणेनंतर, पलाशच्या एका महिलेसोबतच्या कथित फ्लर्टी चॅटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Smriti Mandhana Palash Muchhal Wedding : टीम इंडियाची स्टार खेळाडू स्मृती मानधना हिच्या लग्नात विघ्न आल्याचं पहायला मिळालं होतं. स्मृती आणि म्युझिक डायरेक्टर पलाश मुच्छल यांचं लग्न पुढं ढकलण्यात आलं. स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने लग्नसोहळा पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. अशातच आता सोशल मीडियावर मात्र वेगळीच चर्चा सुरू आहे. त्यावर अद्याप मानधना किंवा मुच्छल कुटूंबियांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. अशातच आता बॉलिवूड अभिनेत्याने खळबळजनक दावा केला आहे.
Palash Muchhal Cheat Smiriti Mandhana
Palash Muchhal Cheat Smiriti Mandhana
advertisement

कथित फ्लर्टी चॅटचे स्क्रीनशॉट

23 नोव्हेंबर रोजी सांगली येथे एका खाजगी समारंभात लग्न होणार होते. लग्नापूर्वीचे समारंभ जोरात सुरू असतानाच, स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना संगीत कार्यक्रमाच्या रात्री हृदयविकाराचा झटका आला, ज्यामुळे लग्न पुढे ढकलण्यात आले. स्मृती आणि पलाश यांचं लग्न पुढं ढकलण्याच्या घोषणेनंतर, पलाशच्या एका महिलेसोबतच्या कथित फ्लर्टी चॅटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मेरी डि'कोस्टा नावाच्या एका महिलेने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पलाशसोबतच्या तिच्या चॅटचे स्क्रीनशॉट शेअर केले.

advertisement

कोरिओग्राफर मुलीसोबत रंगेहाथ पकडले?

अशातच बॉलिवूड अभिनेता केआरके याने ट्विटरवर पोस्ट करत खळबळ उडवून दिलीये. 'रिपोर्ट्स बाहेर आल्या आहेत. स्मृती मंधनाने लग्न समारंभात पलाश मुच्छलला एका कोरिओग्राफर मुलीसोबत रंगेहाथ पकडले. साला कमाल का टोपीबाज आदमी है. म्हणजे तो फक्त प्रसिद्धीसाठी मानधनासोबत लग्न करत होता', असं केआरकेने म्हटलं आहे. केआरकेच्या ट्विटनंतर आता सोशल मीडियावर आणखी चर्चा होताना दिसत आहेत.

advertisement

advertisement

सोशल मीडियावरून पोस्ट डिलिट

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडली, उच्चशिक्षित बहिणींनी सुरू केला व्यवसाय, महिन्याला लाखांची कमाई
सर्व पहा

दरम्यान, स्मृतीने तिच्या सोशल मीडियावर आपल्या लग्नाचे सर्व पोस्ट डिलिट केल्या आहेत. तसेच स्मृतीच्या सहकारी खेळाडूंनी देखील सोशल मीडियावरून पोस्ट डिलिट केल्या. अशातच आता स्मृतीच्या जवळच्या मैत्रिणीने पलाशला अनफॉलो केल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
स्मृतीने पलाशला कोरिओग्राफर मुलीसोबत रेड हँड पकडलं? बॉलिवूड अभिनेत्याचा खळबळजनक दावा! 'लग्नासाठी फक्त तो...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल