हॉर्ट अटॅकची लक्षणं दिसत होती
स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधन यांना 1 वाजून 30 मिनिटांनी छातीत दुखत होतं. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी त्यांना हॉर्ट अटॅकची लक्षणं दिसत होती. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आलं. कार्डियाची लक्षण त्यांना दिसत होती, अशी माहिती हॉस्पिटलकडून देण्यात आली आहे.
advertisement
ब्लड प्रेशर सतत कमी जास्त होतंय
श्रीनिवास मानधना यांना डॉक्टरांच्या देखरेखेखाली ठेवण्यात आलं होतं. स्पेशलिस्ट डॉक्टरांनी त्यांना तपासल्यानंतर त्यांची ईसीजी केल्यावर एन्जिओग्राफी देखील केली जाऊ जाऊ शकते. त्याचा ब्लड प्रेशर सतत कमी जास्त होत असल्याने त्यांना मॉनिटरिंग खाली ठेवलं जात आहे.
अचानक हदयविकाराचा त्रास का?
स्मृतीच्या वडिलांना अचानक हदयविकाराचा त्रास का झाला? असा प्रश्न विचारल्यावर डॉक्टरांनी त्याचं कारण सांगितलं. स्मृतीच्या वडिलांनी लग्नात धावपळ केली असेल. शारिरीक किंवा जास्त मानसिक ताण घेतल्यानंतर असं होणं साहजिक आहे, असं स्मृतीच्या वडिलांवर ईलाज करणाऱ्या डॉक्टरांनी म्हटलं आहे.
क्रिकेटपटू ते केमिकल ड्रिस्टिब्युटर
दरम्यान, स्मृतीचे वडिल श्रीनिवास मानधना हे स्वत: क्रिकेटपटू होते. यानंतर त्यांनी केमिकल ड्रिस्टिब्युटर म्हणून काम केलं. स्मृतीच्या वडिलांनी सांगलीसाठी क्रिकेट खेळलं आहे, पण कुटुंबाकडून पाठिंबा न मिळाल्याने त्यांनी क्रिकेटचा ध्यास सोडून नोकरी करावी लागली. मात्र, लेकीला त्यांनी क्रिकेटचे धडे गिरवले आणि स्मृतीने वर्ल्ड कप देखील जिंकून दिला आहे.
