आज दुपारी एक दीड वाजता स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांच्या डाव्या बाजूच्या छातीत दुखत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना हृद्याचा सौम्य धक्का आला आहे.त्यामुळे सध्या आम्ही त्यांच्या सर्व चाचण्या करत आहोत, असे स्मृतीच्या वडिलांवर उपचार करणाऱ्या डॉ.नमन शहा यांनी सांगितले.
आमच्या कार्डिओलॉजीचे डॉ रोहन थाने यांनी देखील त्यांची प्रकृती पाहून त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सध्या त्याचा बीपी वाढल्यामुळे त्यांचे ठोके देखील वाढले आहेत. त्यामुळे त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहण्याची गरज आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. पण त्यांना बरं व्हायला एक दोन दिवस लागतील,अशी माहिती डॉ.नमन शहा यांनी दिली.
लग्नमंडपात स्मृतीचं वाजत गाजत स्वागत आणि वडिलांना हार्टअटॅक, लग्नसोहळा पुढे ढकलला
रक्तांच्या चाचण्यांमध्ये कार्डिअक एन्जायम वाढल्यामुळे त्यांना ईसीजीवर ठेवण्यात आले आहे आणि गरज पडली तर अॅजिओप्लास्टी करावी लागण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने आम्ही सर्व तयारी केली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.पण आपण एक दिवस रात्रभर त्यांना ठेवून उद्या कुटुंबियांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेऊ,असे डॉ.नमन शहा यांनी सांगितले आहे.
बाबा जोपर्यंत बरे होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही- स्मृती मानधना
आज नाश्ता करतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. पण त्यांना बरं वाटत नसल्याने आम्ही रुग्णवाहिका बोलावली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्रीनिवास मानधना हे डॉक्टरांच्या निगराणीखाली आहेत. स्मृती आणि तिच्या वडिलांचे नाते खूपच भावनिक असून ते जोपर्यंत बरे होत नाहीत तोपर्यंत अनिश्चित काळासाठी लग्नसोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय स्वत: स्मृतीने घेतला असल्याचे तिच्या कुटुंबियांनी माध्यमांना सांगितले आहे.
