तोपर्यंत लग्न करणार नाही
दरम्यान बाबा बरे होत नाहीत तोपर्यंत लग्न करणार नसल्याचा निर्णय स्मृतीने घेतला आहे. आज नाश्ता करत असतानाच स्मृतीच्या वडिलांना अस्वस्थ वाटू लागले, बरं वाटत नसल्यामुळे रुग्णवाहिका बोलावण्यात आली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. श्रीनिवास मानधना हे सध्या डॉक्टरांच्या निगराणीखाली आहेत. स्मृती आणि तिच्या वडिलांचे नाते खूपच भावनिक असून ते जोपर्यंत बरे होत नाहीत, तोपर्यंत अनिश्चित काळासाठी लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय स्मृतीने स्वत: घेतल्याचं कुटुंबियांनी माध्यमांना सांगितलं आहे.
advertisement
कशी आहे स्मृतीच्या वडिलांची तब्येत?
स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीविषयी विचारले असता, डॉक्टर त्यांच्यावर उपचार करीत आहेत. त्यांना सद्य स्थितीत रुग्णालयातच ठेवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तसेच शक्य तितका आराम करण्यासही डॉक्टरांनी बजावल्याने लग्न सोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे स्मृतीच्या कुटुंबियांनी सांगितले.
पाहुणे परतले, डेकोरेशन काढलं
स्मृती मानधनाचं कुटुंबिय रुग्णालयात दाखल झालं आहे. श्रीनिवास मानधना यांची प्रकृती ठीक असून ते सध्या देखरेखीखाली असल्याचं सांगण्यात येत आहे. स्मृतीच्या लग्नाची मॅनेजमेंट करणाऱ्या तोहीन मिश्रा यांच्याकडून आज होणारा लग्न सोहळा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. स्मृती मनधाना आणि संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छल यांचा संध्याकाळी सांगलीमध्ये साडेचार वाजता लग्न सोहळा पार पडणार होता. लग्न सोहळ्यासाठी क्रीडा आणि विविध क्षेत्रातील दिग्गज उपसथित राहणार होते. लग्न स्थळाच्या ठिकाणावरून येणाऱ्या पाहुण्यांना परत पाठवलं जात आहे. तसंच लग्न स्थळाचं डेकोरेशन काढण्याचं काम सुरू आहे.
