दुसरीकडे रविवारी संध्याकाळी पलाश मुच्छल याची प्रकृतीही बिघडली होती, त्यामुळे त्याच्यावरही रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारानंतर पलाशला रुग्णालयातून सोडण्यात आलं, यानंतर सोमवारी तो मुंबईमध्ये आला आहे. पलाश मुच्छलला व्हायरल इनफेक्शन झाल्याचं सांगण्यात येत आहे.
लग्नाचे फोटो डिलीट
दरम्यान स्मृती मानधनाने सोशल मीडियावरून लग्नासंबंधीच्या सर्व पोस्ट डिलीट केल्या आहेत. स्मृतीने तिच्या लग्नाचे तसंच साखरपुड्याचे फोटोही हटवले आहेत. पलाश मुच्छल स्मृती मानधनाला नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर घेऊन गेला, तिथेच त्याने स्मृतीला प्रपोज केलं होतं. हा व्हिडिओ स्मृतीने सोशल मीडियावर शेअर केला होता, ज्याला कोट्यवधी व्ह्यूज आले होते, पण आता तिने हा व्हिडिओही डिलीट केला आहे.
advertisement
पलाश मुच्छलच्या सोशल मीडिया अकाऊंटवर मात्र या सगळ्या पोस्ट अजूनही दिसत आहेत. स्मृतीशिवाय तिच्या भारतीय टीममधल्या मैत्रिणी जेमिमा रॉड्रिग्ज आणि श्रेयंका पाटील यांनीही स्मृतीच्या लग्नासंदर्भातल्या पोस्ट सोशल मीडियावरून हटवल्या आहेत. लग्न रद्द झाल्यानंतर शनिवारी संध्याकाळीच लग्नाचं डेकोरेशनही हटवलं गेलं आणि सांगलीमध्ये दाखल झालेले नातेवाईक माघारी परतले.
स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचं लग्न रविवारी सांगलीमध्ये होणार होतं, पण लग्नाच्या दिवशीच सकाळी स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना नाश्ता करत असताना अस्वस्थ वाटू लागलं, त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. श्रीनिवास मानधना यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
लग्न पोस्टपोन झाल्यामुळे पलाश खूप जास्त मानसिक तणावात आहे, त्यामुळे त्याची तब्येत खराब झाल्याची प्रतिक्रिया पलाशची आई अमिता मुच्छल यांनी दिली आहे. व्हायरल इनफेक्शन आणि पचनाची समस्या जाणवल्यामुळे पलाशला सांगलीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही तासांमध्येच डॉक्टरांनी पलाशला डिस्चार्जही केलं, त्यानंतर सकाळी तो मुंबईसाठी रवाना झाला.
