दोघांनी एकमेकांची मन जिंकली
स्मृती मानधानाच्या मंगेतरानेही चमकदार पिवळ्या रंगाचे कपडे घातले होते. त्यांच्यासोबत ढोल आणि झांजा होत्या. हळदी समारंभासाठी, स्मृतीने बॉर्डर असलेला पिवळा कुर्ता घातला होता. तो शरारा सूटसारखा दिसत होता, पलाझोवर सोनेरी बुटी सजवलेल्या होत्या. यावेळी दोघांनी एकमेकांची मन जिंकली. डोक्याला लागलेली हळद एकमेकांच्या डोक्यावरून काढली. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
advertisement
पोरींनी ठुमके लगावले अन्
एक जवान लडका एक जवान लडकी या दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या सिनेमातील गाण्यावर करवले आणि करवल्या भन्नाट नाचल्या. तर टीम इंडियाच्या पोरींनी देखील आपले जलवे दाखवले. श्रेयांका पाटीलसह अनेक पोरींनी ठुमके लगावले अन् कार्यक्रमात जीव आणला. तसेच आता येत्या 23 तारखेला दोघंही लग्नबंधनात अडकणार आहेत.
पलाश मुच्छलने केलं प्रपोज
दरम्यान, हळदी समारंभाच्या आधी पलाश मुच्छलने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तो डीवाय पाटील येथे मंधानाला प्रपोज करताना दिसत होता. त्यावर स्मृती त्याला हा म्हटली होती. आता दोघंही सातजन्माच्या गाठी बांधण्यासाठी तयार झाले आहेत.
